मुंबई : अभिनेता ह्रतिक रोशन आणि टायगर श्रॉफ स्टारर 'वॉर' चित्रपट बॉक्स ऑफीसवर चांगलाच धुमाकूळ घालताना दिसत आहे. २ ऑक्टोबर रोजी रूपेरी पडद्यावर दाखल झालेल्या 'वॉर' चित्रपटाने चाहत्यांच्या मनावर देखील वार केले आहेत. चित्रपटाच्या कमाईचा आकडा सतत चढत्या क्रमावर आहे. पहिल्याच दिवशी ब्लॉकबस्टर ठरलेल्या 'वॉर'ने तब्बल ४०० कोटींपेक्षा जास्त रूपायांचा गल्ला पार केला आहे.
#War witnesses the normal weekday decline... Goes past ₹ 275 cr... Next target: ₹ 300 cr... #War [#Hindi; Week 2] Fri 7.10 cr, Sat 11.20 cr, Sun 13.20 cr, Mon 4.40 cr. Total: ₹ 264.40 cr. Including #Tamil #Telugu: ₹ 276.40 cr. #India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) October 15, 2019
संपूर्ण जगभरातून चित्रपटाने ४०६.५ कोटी रूपयांची मजल मारली आहे. ट्रेंड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी चित्रपटाच्या कमाईचे आकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध केले आहेत. महत्वाचं वॉर चित्रपटाने अभिनेता विक्की कौशलच्या 'उरी' चित्रपटाला देखील मागे टाकले आहे.
त्याचबरोबर अभिनेता सलमान खानच्या 'भारत' चित्रपटाचा विक्रम 'वॉर' चित्रपटाने मोडीत काढला आहे. 'खालीद कभी मेरा स्टूडंट हुआ करता था, अब उसे लगता हैं की वो अपने टिचर से आगे चला गया हैं...' अभिनेता हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ स्टारर 'वॉर' येत्या काळात किती कोटींपर्यंत मजल मारेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.