सनी देओलचा 'गदर 2' अक्षय कुमारच्या 'ओएमजी 2' वर पडला भारी, बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी केली बक्कळ कमाई

Box Office Collection of Gadar 2 & OMG 2 Day One : 'गदर 2' नं बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी बक्कळ कमाई केली आहे. चित्रपटानं पहिल्याच दिवशी चित्रपटानं धमाकेदार ओपनिंग करत सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या यादीत दुसऱ्या स्थानी पोहोचली आहे. तर  'ओएमजी 2' नं दोन डिजीटचा आकडा पार केलेला नाही. 

दिक्षा पाटील | Updated: Aug 12, 2023, 11:15 AM IST
सनी देओलचा 'गदर 2' अक्षय कुमारच्या 'ओएमजी 2' वर पडला भारी, बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी केली बक्कळ कमाई title=
(Photo Credit : Social Media)

Box Office Collection of Gadar 2 & OMG 2 Day One : गेल्या अनेक दिवसांपासून सनी देओलचा 'गदर 2' आणि अक्षय कुमारच्या 'ओएमजी 2 ' ची प्रेक्षक प्रतिक्षा करत होते. हे दोन्ही चित्रपट काल 11 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाले. हे चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये प्रेक्षकांनी चांगलीच गर्दी केली होती. तर दुसरीकडे एकाच दिवशी हे दोन्ही मोठे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर यांनी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली आणि त्याचसोबत दोन चित्रपट प्रदर्शित झाल्यानं बॉक्स ऑफिसवर त्याचा कसा परिणाम झाला हे जाणून घेण्याची सगळ्यांची प्रतिक्षा आहेत. चला तर जाणून घेऊया कोणत्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर सगळ्यात जास्त कमाई केली आहे. 

'गदर 2' या चित्रपटात सनी देओल बऱ्याच काळानंतर तारा सिंहच्या भूमिकेत दिसत आहे, आणि हा बराच काळ म्हणजे तब्बल 22 वर्षांची प्रेक्षकांची प्रतिक्षा आहे. 'गदर 2' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. चित्रपट पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येनं प्रेक्षक गेले होते. sacnilk नं दिलेल्या माहितीनुसार, 'गदर 2' या चित्रपटानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 40 कोटींचा गल्ला केला आहे. 'गदर 2' या चित्रपटानं पहिल्या दिवशी इतकी चांगली कमाई केली असून हा चित्रपट बक्कळ कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. 2023 मध्ये सगळ्यात कमाई करणारा दुसरा चित्रपट आहे. या आधी बॉलिवूडमध्ये सगळ्यात जास्त कमाई करणारा पठाण हा पहिला चित्रपट होता. 'गदर 2' या चित्रपटात सनी देओलसोबतच अमीशा पटेल महत्त्वाच्या भूमिकेत आहे. 

हेही वाचा : Independence Day 2023: 'या' 7 देशभक्तीच्या गाण्यांवर बनवा ट्रेंडिंग इन्स्टाग्राम रील्स

अक्षय कुमारच्या 'ओएमजी 2 ' विषयी बोलायचे झाले तर या चित्रपटात पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटानं पहिल्या दिवशी काही खास कमाई केली नाही. चित्रपट कमाईच्या बाबतीत दोन डिजीटपर्यंत पोहोचू शकला नाही. 'गदर 2' नं एकीकडे 40 कोटींची कमाई केली होती. तर 'ओएमजी 2' कमाईच्या बाबतीत खूप मागे राहिला आहे. sacnilk नं दिलेल्या माहितीनुसार, अक्षयच्या चित्रपटानं पहिल्या दिवशी 9.50 कोटींचा गल्ला केला आहे. अक्षयचा चित्रपट नुकत्याच प्रदर्शित झालेल्या रॉकी और रानी की प्रेम कहानी आणि सत्यप्रेम की कथा या चित्रपटांना देखील मागे टाकू शकला नाही.