Border Film : नव्वदच्या काळातील सिनेमे हे आजही पाहावेसे वाटतात. तेव्हा गाजलेले सिनेमे आजची पिढीही आनंदाने पाहते. संवाद, नृत्य आणि स्टंटबाजी असा अनेक मसालापट त्यावेळी होत असतानाही अनेक अर्थपुर्ण आणि वेगळे विषय हाताळणारे सिनेमेही अत्यंत गाजले आणि त्यातलाच एक चित्रपट होता तो म्हणजे बॉर्डर.
1997 मध्ये आलेला बॉर्डर हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. तुम्ही हा चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला त्यातील सुभेदार मथुरा दास यांची व्यक्तिरेखाही आठवेल. तेच मथुरा दास जे युद्धाच्या वेळी सनी देओलकडून रजा मागतात आणि पळू लागतात. मथुरा दासची भूमिका सुप्रसिद्ध अभिनेते सुदेश बेरीने साकारली होती.
अनेक चित्रपटांमध्ये तो खलनायकाच्या भूमिकेतही दिसले आहेत. सुदेश बेरी मुख्य अभिनेता म्हणून आपला ठसा उमटवण्यात अपयशी ठरले पण त्यांनी खलनायक म्हणून खूप नाव कमावले. चित्रपटांनंतर सुदेश बेरी छोट्या पडद्यावरही दिसले. आजही ते टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे.
सुदेश यांनी 1988 मध्ये 'खतरों के खिलाडी' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र, त्यांना खरी ओळख 1990 मध्ये आलेल्या 'घायाळ' चित्रपटातून मिळाली. यानंतर सुदेश बेरी 1992 मध्ये दूरदर्शनच्या 'कशिश' शोमध्ये दिसला होता. 'वंश', 'युद्धपथ'मध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या सुदेश बेरी यांना सहाय्यक अभिनेता म्हणून ओळख मिळाली. यापुढे त्यांनी 'आर्मी', 'बॉर्डर', 'रेफ्युजी', 'एलोसी कारगिल' आणि 'टँगो चार्ली' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
बॉर्डर चित्रपटातील त्यांची मथुरा दासची भूमिका खूप गाजली. आज त्यांचे इन्टाग्रामवरचे फोटो पाहून तूम्ही आश्चर्यचकित व्हाल कारण त्यांच्या या नव्या फोटोमध्ये ते अजिबातच ओळखून येत नाहीयेत.