मी हयात असतानाही बोनी कपूर श्रीदेवीसोबत दुसरं लग्न करत होता, पहिल्या पत्तीने सांगितली दुखभरी कहाणी

 चित्रपट निर्माते बोनी कपूर यांचं वैयक्तिक आयुष्यही एखाद्या फिल्मी स्टोरीपेक्षा कमी नाही.

Updated: Sep 12, 2021, 10:31 PM IST
मी हयात असतानाही बोनी कपूर श्रीदेवीसोबत दुसरं लग्न करत होता, पहिल्या पत्तीने सांगितली दुखभरी कहाणी title=

मुंबई : चित्रपट निर्माते बोनी कपूर यांचं वैयक्तिक आयुष्यही एखाद्या फिल्मी स्टोरीपेक्षा कमी नाही. बोनी कपूर यांचं पहिलं लग्न मोना शौरी कपूरसोबत झालं होतं. मीडिया रिपोर्टनुसार, बोनी मोनापेक्षा 10 वर्षांनी मोठे होते आणि लग्नाच्या वेळी मोना 19 वर्षांच्या होत्या. मोना आणि बोनी हे एक परिपूर्ण कपल होतं आणि या दोघांमध्ये सगळं काही ठीक चाललं होतं. पण असं म्हणतात की, नशीब आणि वेळ कधीही बदलू शकतात. असंच काहीसं या दोघांच्या बाबतीत घडलं ज्यामुळे मोना आणि बोनीचे आयुष्य कायमचं बदललं.

वास्तविक, अभिनेत्री श्रीदेवीची बोनी कपूरच्या आयुष्यात एंट्री झाली होती. आणि श्रीदेवी बोनी यांची दुसरी पत्नी झाली होती. श्रीदेवी मोना कपूर यांची चांगली मैत्रीण होती. ही मैत्री ऐवढी होती की, श्रीदेवी मोनाच्या घरी राहयला जायची. मीडिया रिपोर्टनुसार, श्रीदेवी फिल्ममेकर बोनी कपूर यांना राखी बांधायची. खरं तर, अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्या रिलेशनशिपच्या बातम्या समोर येत होत्या तेव्हा मोना यांच्या पायाखालची जमीन सरकली.   एका मुलाखतीत  मोना यांनी या संबधित खुलेपणाने काही गोष्टी सांगितल्या होत्या. ज्यावरुन असं दिसून आलं होतं की, हे प्रकरण किती टोकाला गेलं होतं.

या मुलाखतीत मोना म्हणाल्या होत्या की, 'बोनी कपूर माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठा होता, आमचं लग्न झालं तेव्हा मी 19 वर्षांची होते. अशा परिस्थितीत, माझा पती दुसऱ्या कोणाच्या प्रेमात आहेत हे जाणून घेतल्यावर मला खूप मोठा धक्का बसला होता. आमच्या नात्यामध्ये एकमेकांसाठी कोणतीही संधी किंवा संधी शिल्लक नव्हती कारण श्रीदेवी माझ्या पतीच्या मुलाची आई बनली होती. बोनीशी लग्न केल्यानंतर श्रीदेवीवर 'होम ब्रेकर' असल्याचा आरोपही करण्यात आला होता.