अमिताभ बच्चन यांचं नाव ऐकताच 'या' अभिनेत्याने सोडला चित्रपट, दिग्दर्शकाची विनंतीही धुडकावली

Amitabh Bachchan Unknown Facts: अमिताभ बच्चन हे अजूनही सुपरस्टार आहेत. मात्र, बॉलिवूडमध्ये काही अभिनेते आहेत ज्यांना अमिताभ यांच्यासोबत काम करणे कधी रुचले नाही.

मानसी क्षीरसागर | Updated: May 21, 2024, 12:27 PM IST
अमिताभ बच्चन यांचं नाव ऐकताच 'या' अभिनेत्याने सोडला चित्रपट, दिग्दर्शकाची विनंतीही धुडकावली title=
bollywood superstar mind got shocked after hearing amitabh bachchan name he left film

Amitabh Bachchan Unknown Facts: अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या फिल्मी करिअरमध्ये अनेक सुपरस्टारसोबत स्क्रीन शेअर केली आहे. अमजद खान, प्राण आणि महमूद यांचे ते अत्यंत जवळचे मित्र होते. नंतर हळूहळू अमिताभ बॉलिवूडमध्ये जम बसवू लागले. मात्र, त्यांना यश मिळाल्यानंतर मात्र त्यांचे काही मित्र त्यांच्यापासून लांब गेले. राजेश खन्ना व शत्रुघ्न सिन्हा यांच्याबरोबरच आणखी एक सुपरस्टार होता ज्याने कधीच अमिताभ यांना पसंत केले नाही. 

अमिताभ यांनी सात हिंदुस्तानी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. हा चित्रपट त्यांच्या करिअरमधील सुपरफ्लॉप चित्रपट ठरला होता. त्यानंतर त्यांनी रेशमा आणि शेरा या चित्रपट केला. त्यात त्याने मुक व्यक्तीची भूमिका साकारली होती. मात्र, हा चित्रपटही फ्लॉप ठरला. राजेश खन्ना यांच्यासोबत केलेला आनंद या चित्रपटानंतर त्यांना ओळख मिळाली. मात्र, अमिताभ बच्चन यांनी डझनभर फ्लॉप चित्रपट केले. त्यामुळं मुंबईतील निर्माते त्यांना चित्रपटात घेण्यास कचरत होते. तर, अमिताभदेखील एक चित्रपट मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. 

अमिताभ यांना चित्रपट मिळणेच बंद झाले. अशातच दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांनी मोठी रिस्क घेत जंजीर चित्रपट बनवला, या चित्रपटात त्यांनी अमिताभ बच्चन यांना घेतलं. यावरुन प्रकाश मेहरा यांना खूप टोमणेही ऐकावे लागले होते. मात्र, जंजीर चित्रपट सुपरहिट ठरला आमि अमिताभ यांना सिनेसृष्टीत वेगळी ओळख मिळाली. हा चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन मनमोहन देसाई यांचे आवडते अभिनेते झाले होते. त्या दोघांनी कुली, अमर-अकबर- अँथनी, परवरीश, सुहाग,नशीब, मर्द,गंगा जमुना सरस्वती सारख्या सुपरहिट चित्रपटात काम करत बॉलिवूडचा एकापेक्षा एक चित्रपट देत इतिहास रचला. 

1982 साली मनमोहन देसाई यांनी एक चित्रपट करण्याचे ठरवले होते. तर, या चित्रपटात त्यांना मुख्य अभिनेता म्हणून अमिताभ बच्चन आणि राजकुमार यांना कास्ट करायचे होते. या चित्रपटाचे नाव देश प्रेमी होते. मात्र, मनमोहन यांची ती इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. कारण राजकुमार यांना चित्रपटाबाबत कोणतीही तडजोड करायची नव्हती. असं म्हणतात की, जेव्हा अमिताभ बॉलिवूडमध्ये आपला जम बसवत होते तेव्हा राजकुमार हे सुपरस्टार होते. जर अमिताभ हे दिग्दर्शकाचे चांगले मित्र आहेत अशावेळी राजकुमार यांच्या भूमिकेबाबत अन्याय होऊ शकतो, असं त्यांना वाटलं. 

राजकुमार यांनी त्यांच्या मनातली ही खदखद दिग्दर्शक यांनाही बोलून दाखवली. मात्र दिग्दर्शकाने राजकुमार यांना विश्वास दिला की असं काही होणार नाही. त्यानंतर चित्रपटात राजकुमार यांना जास्त स्क्रीन देण्यात आली तर अमिताभ यांचे काही सिन कट करण्यात आले. सिन कट करण्यात आल्यामुळं अमिताभ यांना त्याचे पैसेही देण्यात आले. त्यामुळं अमिताभ यांचंही मन राखलं जाईल. मात्र काहीच दिवसात राजकुमार यांना याबद्दल काळलं तेव्हा त्यांना याचा खूप राग आला. 

राजकुमार यांनी अखेर या चित्रपटात बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मनमोहन यांनी राजकुमार यांना समजवण्याचा खूपदा प्रय़त्न केला मात्र, राजकुमार यांनी अजिबात ऐकलं नाही आणि त्यांनी चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला. नंतर, या चित्रपटात राजकुमार यांच्याजागी शम्मी कपूर यांना घेण्यात आले. देश प्रेमी या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासह हेमा मालिनी, शर्मिला टागोर, नवीन निश्चल, परवीन बाबी, उत्तम कुमार,  शम्मी कपूर, प्रेमनाथ, परीक्षित साहनी यांच्या भूमिका होत्या.