VIDEO : 'सारे जहाँ से अच्छा'चं नवं व्हर्जन ऐकून पडतील असंख्य प्रश्न

'संसद मे हमला हो या बम फटे मुंबई मे... कुछ मत कहना..'

Updated: Apr 7, 2019, 12:13 PM IST
VIDEO : 'सारे जहाँ से अच्छा'चं नवं व्हर्जन ऐकून पडतील असंख्य प्रश्न  title=

मुंबई : देशभक्तीपर गीतांचा उल्लेख होताच अगदी सहपणे कोणाकडूनही उल्लेख होणारं गाणं म्हणजे 'सारे जहाँ से अच्छा.....' बालवयापासून ते आतापर्यंत वर्षे या गाण्याची जादू प्रत्येकावर पाहायला मिळाली. मुळात या गाण्याची जादू, त्याप्रती आणि देशाप्रती असणारा आदर दिवसेंदिवस वाढतच गेला. अशाच या गाण्याचं नवं व्हर्जन प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या रहस्यमयी मृत्यूमागचे काही तपशील, घटना या साऱ्या घटनांभोवती या चित्रपटाचं कथानक फिरणार असून अर्थातच त्याला राजकीय वलयही असणार आहे. 

'द ताश्कंद फाईल्स'मधील हे पहिलंवहिलं गाणं, 'सारे जहाँ से अच्छा', प्रेक्षकांच्या मनात असंख्य प्रश्न उपस्थित करुन जात आहे. सुरुवातीला जुन्या गाण्याची चाल आणि मग क्षणार्धातच रॅप साँग या प्रकारात केलेली त्याची प्रभावी बांधणी रसिकांची दाद मिळवत आहे. जयराम मोहन, आर्य आचार्य, आरजे अनुराग, आरजे अर्चना, आरजे रोहिणी आणि इतर कलाकारांनी हे गाणं गायलं आहे. 

विवेक अग्निहोत्री आणि रोहित शर्मा लिखित सोशल मीडियावर सध्या हे गाणं बरंच चर्चेत आहे, ते म्हणजे त्याच्या शब्दांमुळे. विचार करायला भाग पाडणाऱ्या आणि देशातील राजकारण, जनतेच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करणाऱ्या या गाण्यामुळे निवडणुकांच्या माहोलालाही एक वेगळं वळण दिलं आहे, असं म्हणायला हरकत नाही. 'द ताश्कंद फाईल्स' या चित्रपटाविषयी सांगावं तर, देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या गूढ मृत्यूचं रहस्य उकल्याणाचा आणि अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तर मिळवण्याचा प्रयत्न यातून करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. या चित्रपटात अभिनेते मिथुन चक्रवर्ती आणि नसिरुद्दीन शाह या तगड्या कलाकारांसोबतच श्वेता बासू, पंकज त्रिपाठी, पल्लवी जोशी, मंदिरा बेदी, विनय पाठक अशी स्टारकास्टही झळकणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांसाठी हा चित्रपट परवणीच ठरणार आहे.