बालपणी अत्याचार, प्रियकराचं निधन, आपल्यांकडूनच विश्वासघात; पाहा इतके आघात झेलत मिलिंद सोमणची पत्नी म्हणतेय.....

पाहा इतकं सारं होऊनही... 

Updated: Sep 20, 2021, 08:35 AM IST
बालपणी अत्याचार, प्रियकराचं निधन, आपल्यांकडूनच विश्वासघात; पाहा इतके आघात झेलत मिलिंद सोमणची पत्नी म्हणतेय.....  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : बॉलिवूड (Bollywood) आणि भारतीय मॉडेलिंग विश्वात 'आयर्न मॅन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिलिंद सोमण यानं कायमच नवे मापदंड घालून दिले आहेत. फिटनेस असो किंवा मग जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन, मिलिंदनं कायमच सर्वांच्या मनाचा ठाव घेतला आहे. त्याची पत्नी, अंकिता (Ankita Konwar) हीसुद्धा अशीच कामगिरी करताना दिसत आहे. 

अंकितानं कायमच महत्त्वाच्या मुद्द्यांवर तिच्या ठाम भूमिका मांडल्या आहेत. यावेळी ती चर्चेत आली आहे ते म्हणजे खासगी आयुष्यामुळं. स्वत:वर प्रेम करा, असा संदेश देणारा एक व्हिडीओ अंकितानं शेअर केला आहे. ज्यामध्ये तिनं जीवनातील अनेक खासगी गोष्टी उघड केल्या आहेत. 

एक व्हिडीओ शेअर करत आपल्याला आतापर्यंत आलेल्या वाईट अनुभवांचा पाढा अंकितानं वाचला आहे. कॅप्शनमध्येही तिनं याचा उल्लेख केला आहे. 'लहानपणी अत्याचार झाले. हॉस्टेलमध्येच लहानाची मोठी झाले. परदेशात एकटी राहिले. विश्वासार्ह लोकांनीच विश्वासघात केला. भावाला गमावलं, प्रियकराला गमावलं, वडिलांना गमावलं... दिसण्यावरुन अनेकांनी मला बऱ्याच नावांनी संबोधलं. ज्यांच्यावर मी प्रेम करते (मिलिंद सोमण) त्यासाठीही माझ्याबाबत बरंच काही बोललं गेलं.. तरीही तुम्ही मला आशावादी पाहिलंय तर मी सांगू इच्छिते हो मी आहे... आशावादी. स्वत:वर प्रेम करा.'

अंकाताची पोस्ट पाहून मिलिंद सोमण म्हणाला... 
पत्नीनं केलेली ही पोस्ट पाहून अभिनेता मिलिंद सोमण यानं त्यावर आपली प्रतिक्रिया दिली. त्यानं आनंद व्यक्त करत, तू फार लांबचा पल्ला गाठला आहेस अशा शब्दांत पत्नीला दिलासा दिला. फक्त मिलिंद सोमणच नव्हे, तर इतरही अनेक सेलिब्रिटींनीही अंकिताच्या या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या. इतक्या नकारात्मक गोष्टी घडूनही जगण्याचा संघर्ष मोठ्या जिद्दीनं लढणाऱ्या अंकिताला सर्वांनीच शाबासकी दिली.