Karan Johar Illness: करण जोहर सध्या आपल्या कॉफी विथ करण (Karan Johar Show Coffee With Karan) या कार्यक्रमामुळे व्यस्त आहे. त्याचा हा सातवा सिझन (KWK S7) सध्या जोरदार ट्रेण्डमध्ये आहे. सोशल मीडियावर तर या सिझनची भलतीच चर्चा आहे. या शोमधून सेलिब्रेटींच्या पर्सनल लाईफबद्दल चर्चा केली जाते. त्यामुळे हा शो प्रेक्षक पाहतातच पाहतात. (bollywood director karan johar reveals about his health issues related to depression eating disorder body image)
मध्यंतरी एका मुलाखती दरम्यान करणनं आपल्या मानसिक आजाराविषयी खुलासा केला होता. 2016 साली करण जोहर मानसिक आजाराशी झुंज देत आहेत. (Karan Johar Mental Illness) त्या मुलाखतीत तो म्हणाला होता मला रोज कसलाच आनंद वाटतं नसे. त्याचबरोबर माझे मुड स्विंग्सही होत होते. त्यामुळे मला सतत डिप्रेशनसारखे (Depression) वाटत होते.
आपल्या डिप्रेशनबद्दल बोलताना करण जोहरनं खुलासा केला की फक्त मानसिक आजारचं नाही तर आपल्या बॉडी एमेजला (Body Image) घेऊनही त्याला अनेकदा दडपण आलं आहे. आपल्या बॉडी एमेजवरूनही त्याला एकदा संकोच वाटला आहे तो म्हणतो, 'मला स्विमिंग पूल मध्ये जायचीसुद्धा भिती वाटायची. पाण्यात उतरतानही मला कायम भिती वाटायची.'
'मी पाण्यात उतरण्यापुर्वी आधी सगळीकडे पाहायचो आणि मग पाण्यात उतरायचो. करण जोहरनं इतर जण आपल्या शरीराकडे पाहून काय म्हणतील याचीही अनेकदी भिती वाटायची', असं तो म्हणाला.
एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार करण जोहरला इटिंग डिसोर्डर (Eating Disorder) असल्याचेही कळते. आपल्या या आजारावर मात करण्यासाठी करण जोहर हग थेरपी (Hug Thearpy) घेतो.