पाहा मालदीवमध्ये एकाहून एक सरस बिकीनीमध्ये काजोलच्या बहीणीचा जलवा

तनिषा कुठे स्वीमसूटमध्ये दिसत आहे, तर कुठे ती बिकीनीमध्ये दिसत आहे. 

Updated: Sep 8, 2021, 05:54 PM IST
पाहा मालदीवमध्ये एकाहून एक सरस बिकीनीमध्ये काजोलच्या बहीणीचा जलवा title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेत्री काजोल हिची बहीण, तनिषा मुखर्जी (tanisha mukherjee) हिनं 'बिग बॉस'च्या घरात येत सर्वांचं लक्ष वेधलं. या रिअॅलिटी शोनं तिला वेगळी ओळख दिली. अशी ही तनिषा सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती या सुट्टीतील काही फोटोही शेअर करत आहे. 

तनिषा कुठे स्वीमसूटमध्ये दिसत आहे, तर कुठे ती बिकीनीमध्ये दिसत आहे. बिकीनीवर एकच कापड गुंडाळत कुठे ती ग्लॅमरस लूकला प्राधान्यं देताना दिसतेय तर प्रिंटेड बिकीनीलाही पसंती देताना दिसत आहे. 

मालदीव म्हटलं की, आला समुद्र आणि समुद्र म्हटला की एखाद्या जलपरीप्रमाणं आपल्या सौंदर्यानं सर्वांनाच घायाळ करणारी सौंदर्यवती आलीच. तनिषा सध्या या फोटोंमध्ये अशाच रुपात दिसत आहे. 

तनीषा ने शेयर की मालदीव वकेशन की बोल्ड तस्वीरें

पहले भी शेयर कर चुकी हैं बोल्ड तस्वीरें

39वें बर्थडे पर कराया एग फ्रीज़

जब मेरे बच्चा कंसीव करने की कोई उम्मीद नहीं थी

तनिषानं यापूर्वीही सोशल मीडियावर तिचे बोल्ड फोटो शेअर केले आहेत. कलाजगतात तिला आपल्या बहिणीप्रमाणं यशस्वी होता आलं नाही. पण, सोशल मीडिया मात्र ती गाजवतेय असं म्हणायला हरकत नाही. बिग बॉसच्या घरात असताना अरमान कोहली याच्यासोबत असणाऱ्या नात्यामुळं ती चर्चेत आली होती. हल्लीच वयाच्या 39 वर्षांच्या टप्प्यावर पोहोचलेल्या तनिषानं एग फ्रिजिंगच्या मुद्द्यावरुन सर्वांच्या नजरा वळवल्या होत्या.