हिंदू असल्याची लाज वाटते; आघाडीच्या बॉलिवूड अभिनेत्रीच्या ट्विटनं खळबळ

परखड मतं मांडण्यासाठी ती ओळखली जाते...

Updated: Oct 25, 2021, 07:30 AM IST
हिंदू असल्याची लाज वाटते; आघाडीच्या बॉलिवूड अभिनेत्रीच्या ट्विटनं खळबळ  title=
स्वरा भास्कर

मुंबई : देशातील विविध मुद्द्यांवर आपली मतं मांडण्यासाठीसुद्धा बॉलिवूड कलाकार ओळखले जातात. समाजिक भान जपत, या समाजाप्रती आपलंही काही देणं आहे याची जाण राखत काही कलाकार मंडळी कायमच त्यांच्या भूमिका स्पष्टपणे मांडत असतात. अशाच कलाकारांच्या यादीत येणाऱ्या एका अभिनेत्रीनं तिच्या एका ट्विटमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

एक हिंदू असल्याची लाज वाटते.... असं म्हणणारी अभनेत्री आहे स्वरा भास्कर (Swara Bhaskar). स्वरानं एक व्हिडीओ रिट्विट केला आहे. जिथं लोकांचा एक घोळका ‘जय श्री राम’चे नारे चढ्या स्वरात बोलताना दिसत आहेत. याच व्हिडीओला अनुसरून तिनं आपल्या हिंदू असल्याची लाज वाटत असल्याचं स्पष्ट केलं. यावरुन तिची बरीच खिल्ली उडवली जात आहे, तर चाहत्यांची एक फळी स्वराच्या बचावासाठी धावून आली आहे.

नमाज वाचणाऱ्यांसमोर दिले जाणारे जय श्रीरामचे नारे पाहून स्वराचा संताप अनावर झाला आहे. हे पाहूनच तिनं ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. शुक्रवारी दिल्लीतील गुरुग्राममधील सेक्टर 12 – A येथे खासगी भूखंडावर मुस्लिम समुदायातील काही लोक नमाज अदा करत होते. त्याचवेळी तेथे जमाव आला (कथित बजरंग दलाचे कार्यकर्ते) आणि तिथे त्यांनी राम नामाची नारेबाजी सुरु केली. ज्यनंतर या नजीकच्या भागात तणावाचं वातावरण पाहायला मिळालं.

स्वरा भास्कर ने कहा- हिंदू होने पर शर्मिंदा हूं, लोगों ने जमकर कर दिया ट्रोल

हिंदू- मुस्लिम धर्मियांमध्ये धार्मिक आणि सामाजिक तेढ निर्माण करुन मोठ्या प्रमाणात तणावाची परिस्तिथी निर्माण करण्यासाठी म्हणून सक्रिय असणाऱ्या टोळीचा आणि या मानसिकतेचा स्वरानं तिच्या शैलीत निषेध केला.