सुष्मिताचा 'परफेक्ट फॅमिली फोटो' पाहाच....

प्रियकराला उद्देशून सुष्मिता म्हणतेय... 

Updated: Jul 19, 2019, 09:59 AM IST
सुष्मिताचा 'परफेक्ट फॅमिली फोटो' पाहाच....  title=
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : सौंदर्य, जबाबदारपणा आणि खंबीर निर्णय घेण्याची क्षमता या बळावर अभिनेत्री सुष्मिता सेन हिने तिची वेगळी अशी ओळख प्रस्थापित केली आहे. ज्यामागोमागच तिने करिअरसोबत कुटुंबालाही प्राधान्य दिलं. सुष्मिताच्या खासगी आयुष्याविषयीसुद्धा बऱ्याच चर्चा पाहायला मिळाल्या होत्या. पण, ती आता या साऱ्यात बरीच पुढे आली आहे. मुख्य म्हणजे तिला हक्काचा साथादीर मिळाला आहे. 

सोशल मीडियावर सुष्मिता तिच्या या खास साथीदाराचे फोटोही पोस्ट करत असते. सध्याही तिने असाच एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तिच्या दोन्ही मुली आणि प्रियकर रॉमन शॉलही दिसत आहे. या फोटोतीच खास बाब म्हणजे त्याचं कॅप्शन. सुष्मिताने रोमनच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहता, 'तू इतका गंभीर का आहेस?' असा प्रश्न त्याला विचारला आहे. सोबतच फॅमिली सेल्फीसाठी साऱ्यांनी चांगलीच मेहनत घेतली आहे, असंही ती म्हणाली आहे. 

सुष्मिताच्या कुटुंबाचा हा सेल्फी पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा तिच्या आणि रोमनच्या नात्याची चर्चा सुरु आहे. गेल्या काही महिन्यांपासून बी- टाऊनची ही अभिनेत्री एका सुरेख अशा वळणावर असून, या वळणार तिला तितक्याच विश्वासार्ह व्यक्तीची साछ लाभली आहे. 

नात्याची अधिकृत माहिती दिल्यानंतर तिने कधीच या गोष्टी इतरांपासून लपवण्याचा प्रयत्न केला नाही. उलटपक्षी या क्षणांचा ती मनमुराद आनंद घेताना दिसत आहे. सुष्मिताची दर दुसरी सोशल मीडिया पोस्ट ही रोमनविषयी असते. तिच्या आणि तिच्या मुलींच्या आयुष्यात आता रोमनला एक खास स्थान मिळालं असून, ही जोडी लग्नबंधनात अडकून सहजीवनाचा प्रवास कधी सुरु करते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.