डाएट को मारो गोली; सहलीवर अभिनेत्रीकडून मित्रांचंही जेवण फस्त; पाहा धमाल फोटो, व्हिडीओ

पाहा सहलीसाठी तिनं कोणत्या ठिकाणाला पसंती दिली होती... 

Updated: Sep 20, 2021, 11:25 AM IST
डाएट को मारो गोली; सहलीवर अभिनेत्रीकडून मित्रांचंही जेवण फस्त; पाहा धमाल फोटो, व्हिडीओ title=
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : काही केलं तरीही भूक लागत नाही, असं म्हणणाऱ्या अनेक मंडळींनी हवापालट केला अर्थात ही मंडळशी कोणत्या बाहेरच्या ठिकाणी, विशेष म्हणजे पर्यटनासाठी गेली की तिथे मात्र त्यांचा वेगळाच अंदाज दिसून येतो. मुळात पोटभर आणि चवीचं खाणं हासुद्धा पर्यटनामागता मुख्य हेतू असतो. सध्या एक बॉलिवूड अभिनेत्रीही तिच्या Foodie मूडमध्ये दिसत आहे. 

भारतातील एका सुरेख अशा ठिकाणी मित्रांसमवेत गेलेली ही अभिनेत्री तिथे त्यांचं खाणं फस्त करत आहे. बरं हे सारं खुद्द या अभिनेत्रीनंच सोशल मीडियावर फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. 

सुट्ट्यांचा आनंद घेणारी ही अभिनेत्री आहे, सारा अली खान. सारा सध्या निसर्गसौंदर्यानं नटलेल्या काश्मीरच्या कुशीत निवांत क्षण व्यतीत करत आहे. ती इथं शेषनाग तलाव परिसरात असून, तिथून तिनं काही खास फोटोही शेअर केले आहेत. 

काश्मीरच्या निसर्गसौंदर्य़ाची छटा साराच्याही चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत आहे. बर्फाच्छादित डोंगररागांमध्ये सूर्यकिरणांचं प्रखर तेज अऩुभवताना ती जिभेचे चोचलेही पुरवताना दिसत आहे. 

आपल्या सहलीतील खास क्षण शेअर करत सारानं चारोळीही लिहीली आहे. ज्याच्या शेवटी तिनं मित्रांचंही जेवण फस्त केल्याबद्दल त्यांची माफी मागितली आहे. कामाच्या व्यग्र वेळापत्रकातून शक्य असेल तेव्हा सारा सहलीला जाण्यास प्राधान्य देते. कधी गुलमर्ग, कधी काश्मीर तर कधी मालदीव अशा ठिकाणांना ती पसंती देताना दिसते. कुटुंब आणि मित्रपरिवाराची तिला या सहलींदरम्यान साथ असते.