राधिकासाठी लग्न एक 'बहाणा'; खरं कारण ऐकल्यावर धक्का बसेल

 विवाहसंस्थेवर विश्वास नसल्याचंही तिनं स्पष्ट केलं.   

Updated: Sep 7, 2021, 04:54 PM IST
राधिकासाठी लग्न एक 'बहाणा'; खरं कारण ऐकल्यावर धक्का बसेल   title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : लग्न म्हणजे दोन जीवांचं मिलन, लग्नाच्या गाठी स्वर्गातूनच बांधून आलेल्या असतात या आणि अशा अनेक समजुती पूर्णपणे न पटणाऱ्यांपैकीच एका अभिनेत्रीनं तिच्या जीवनातील सर्वात मोठा निर्णय लग्नाशीच संबंधित घेतला. 

ही अभिनेत्री म्हणजे राधिका आपटे. ब्रिटीश म्युझिशियन बेनेडिक्ट टेलर याच्याशी राधिका 2012 मध्ये विवाहबंधनात अडकली. त्याच्याशी विवाहबंधनात अडकण्यामागे तिचा एक महत्त्वाचा हेतू होता. अभिनेता विक्रांत मेसी याच्याशी संवाद साधताना तिनं याबाबतचा खुलासा केला होता. आपला विवाहसंस्थेवर विश्वास नसल्याचंही तिनं स्पष्ट केलं. 

राधिका आपटेने स्वत:च्या लग्नात नेसली फाटलेली साडी, कारण...

 

सध्या बेनेडिक्टसोबत लंडनमध्ये असणाऱ्या राधिकानं फक्त व्हिसा मिळवण्यासाठीच त्याच्याशी लग्न केलं होतं. याबाबतच सांगताना ती म्हणाली, 'तर.... मला लक्षात आलं की तुम्ही विवाहबद्ध असाल तर व्हिसा मिळणं सोपं असतं. माध्या मते खरंतर कोणत्याही सीमाच नसाव्यात. लग्नाच्याच बाजूनं असणाऱ्यांपैकी मी नाही. माझा विवाहसंस्थेवर विश्वास नाही. मी लग्न केलं कारण व्हिसा मिळवणं कठीण होतं आणि आम्हाला (बेनेडिक्ट आणि राधिका) एकत्र राहायचं होतं. मला वाटतं हे चुकीचं आहे.'

राधिका नृत्य शिकण्यासाठी परदेशी गेली असता, 2011 मध्ये तिची बेनेडिक्टशी ओळख झाली. ज्यानंतर 2012 मध्ये या जोडीनं विवाहबंधनात अडकण्याचं ठरवलंय राधिकानं रजिस्टर पद्धतीनं लग्न केलं होतं. त्यावेळी राधिकानं तिच्या आजीची साडी नेसली होती.  

हिंदी चित्रपट आणि वेब विश्वात राधिका आपटेच्या नावाभोवती बरंच वलय पाहायला मिळतं. राधिकानं आतापर्यंत कायमच आव्हानात्मक भूमिकांना न्याय दिला आहे. प्रत्येक भूमिकेचं वेगळेपण जपत तिनं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.