Priyanka Chopra Injury : बॉलिवूड आणि हॉलिवूड प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा नेहमी चर्चेत असते. सध्या प्रियांका तिच्या पुढील चित्रपटाच्या शूटिंगसाठी ऑस्ट्रेलियात आहे. ती लवकरच 'द ब्लफ' या चित्रपटात दिसणार आहे. सध्या प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिच्या हातावर जखम झाल्याचं दिसत आहे. तिच्या हाताची अवस्था खूपच वाईट दिसत आहे.
अनंत-राधिकाच्या लग्नात प्रियांका
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या भव्य लग्नाला अभिनेत्री प्रियांका चोप्राने हजेरी लावली होती. या विवाह सोहळ्यानंतर प्रियांका ऑस्ट्रेलियामध्ये परतली आहे. प्रियांका चोप्रा सध्या तिच्या आगामी 'द ब्लफ' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाल्यापासून प्रियांका चोप्रा तिच्या चाहत्यांना इन्स्टाग्रामच्या माध्यमातून प्रत्येक अपडेट देत आहे.
प्रियांकाच्या पोस्टमध्ये काय?
ऑस्ट्रेलियात चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान प्रियांका चोप्रा जखमी झाली होती. अभिनेत्रीने तिच्या दुखापतीची माहिती देत इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. तिने तिच्या जखमी हाताचा फोटो शेअर केला आहे. मात्र, प्रियांकाच्या हातावर दिसणारी जखम ही खरी नसून मेकअपच्या माध्यमातून तिच्या हातावर या खुणा निर्माण करण्यात आल्या आहेत.
प्रियंका चोप्राने शेअर केलेल्या फोटोमध्ये ऑस्ट्रेलियन मेकअप आर्टिस्ट शेरॉन रॉबिन्स तिच्या हातावर काम करताना दिसत आहे. मात्र, सुरुवातीला अभिनेत्रीने शेअर केलेली पोस्ट पाहून चाहत्यांना धक्का बसला. पण ही सगळी जादू शेरॉनच्या मेकअपमुळे आहे. फोटो शेअर करताना प्रियांकाने म्हटलं आहे की, “Think I need a manicure. #TheBluff."