Parineeti Chopra च्या चेहऱ्याला झालं तरी काय? फोटोपाहून चाहत्यांना बसला धक्का

नेमका तिचा चेहरा असा वेगळा का दिसतोय यावर तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

Updated: Sep 5, 2022, 07:29 PM IST
Parineeti Chopra च्या चेहऱ्याला झालं तरी काय? फोटोपाहून चाहत्यांना बसला धक्का  title=

Parineeti Chopra:  परिनिती चोप्रा (Parineeti Chopra) ही सगळ्यांचीच लाडकी अभिनेत्री आहे. प्रियांका चोप्राची चुलत बहीण परिनिती चोप्रा तिच्या एवढीच तीही जगप्रसिद्ध अभिनेत्री आहे. परंतु सध्या तिचा एक नवा फोटो सोशल मीडियावरती व्हायरल होतो आहे. हा फोटो पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. नेमका तिचा चेहरा असा वेगळा का दिसतोय यावर तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. (bollywood actress parineeti chopras new photo goes viral fans shocked seeing her look photo viral)

एका व्हायरल व्हिडीओच्या पेजवरून परिनिती चोप्राचा एक फोटो सध्या चर्चेत आहे. यात तिच्या चेहऱ्यावर इजा झाल्याच्या दिसत आहेत. तिच्या चेहऱ्यावरील हावभावही फार गंभीर दिसत आहेत. तेव्हा नक्की तिच्या चेहऱ्याची अशी अवस्था का झाली हे पाहून सर्वच जण आश्चर्यचकित झाले आहेत. 

परंतु समोर आलेल्या माहितीनुसार परिनीती चोप्रा कदाचित आपल्या नव्या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. आणि हा व्हायरल झालेला फोटोही त्या नव्या चित्रपटाच्या शुटिंगचा आहे असे बोलले जाते आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तिने सार्वजनिक हेतूच्या दृष्चीने नुकतीच दिवजय फाऊंडेशन आणि भामला फाउंडेशनशी हातमिळवणी केली आहे आणि ती लोकांना त्याच्याशी जोडलेल्या सामजिक कार्यात सामील होण्याचे आवाहन केले आहे. ती म्हणते कीअनंत चतुर्थदशीच्या दिवशी आपली समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठी आणि त्यांना कचरामुक्त ठेवण्यासाठी तिच्यासोबत सामील व्हा.