'खूप सारं प्रेम आणि...', म्हणत मलायकाकडून अर्जुनसोबतच्या नात्याची कबुली

अखेर तिनेही या नात्याचा जाहीरपणे स्वीकार केला 

Updated: Jun 27, 2019, 01:38 PM IST
'खूप सारं प्रेम आणि...', म्हणत मलायकाकडून अर्जुनसोबतच्या नात्याची कबुली  title=

मुंबई : खासगी आयुष्यात आलेल्या काही कठीण वळणांवरुन वाटचाल केल्यानंतर आता अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर त्यांच्या नात्यात स्थिरावत आहेत. काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या रिलेशनशिपविषयी माध्यमांमध्ये चर्चा पाहायला मिळाल्या होत्या. याच चर्चांना अर्जुनने दुजोरा देत मलायकासोबतचं नातं जाहीरपणे स्वीकारलं होतं. ज्यामध्ये आता मलायकानेही एक पाऊल उचललं आहे. 

अर्जुनच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बुधवारी मलायकाने त्याच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. यापूर्वी कधीच तिने अर्जुनसोबतचा फोटो पोस्ट केला नव्हता. पण, आता मात्र खुद्द मलायकानेही या नात्याची जाहीरपणे ग्वाही दिल्याचं स्पष्ट होत आहे. तिने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये अर्जुनसोबतचं तिचं हे नातं किती सुरेख आहे, याची अनुभूती येत आहे. 

आयुष्यात आनंदाची उधळण करणाऱ्या अर्जुनला शुभेच्छा देत मलायकाने त्याच्यासाठी खुप सारं प्रेम आणि आनंदाची कामना केली. एकमेकांचा हात हाती घेऊन प्रेमाच्या प्रवासाची वाटचाल करणाऱ्या या जोडीचा अंदाज खऱ्या अर्थाने #CoupleGoals देत आहे, असं म्हणायला हरकत नाही. 

 
 
 
 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

यंदाच्या वर्षअखेरीस ही जोडी त्यांच्या नात्याला एक वेगळं नाव देणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. पण, अर्जुनने मात्र या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे मलायका आणि अर्जुनची सध्यातरी लगीनघाई नाही, हे खरं.