मुंबईच्या 'या' भागात अर्जुन, मलायकाचं नवं घर

अद्याप कोणीही त्यांच्या नात्याविषयी खुलेपणाने बोललेलं नाही.

Updated: Nov 26, 2018, 05:01 PM IST
मुंबईच्या 'या' भागात अर्जुन, मलायकाचं नवं घर title=

मुंबई : मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांच्या नात्याविषयीची प्रत्येक गोष्ट गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत आहे. गेल्या बऱ्याच काळापासून, सर्वांचच लक्ष वेधणाऱ्या या जोडीने आता म्हणे मुंबईतील एका उच्चभ्रू भागात घर खरेदी केलं आहे. 

लोखंडवाला परिसरात या दोघांनीही एक घर खरेदी केल्याचं कळत असून, 'पिंकव्हिला'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार काही खासगी कारणांसाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याचं स्पष्ट होत आहे. 

मलायकासोबत अर्जुन येत्या काळात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये येणार असल्याचंही अनेकांचं म्हणणं आहे. पण, तुर्तास या दोघांकडूनही तशा प्रकारची कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही त्यामुळे आता हे घर त्यांनी नेमकं का खरेदी केलं असावं असाच प्रश्न अनेकांच्या मनात डोकावत आहे. 

दरम्यान, सध्याच्या घडीला या घराच्या सजावटीचं काम सुरु असून, खुद्द मलायका आणि अर्जुनच त्यात लक्ष घालत आहेत. या दोघांपैकी कोणीही त्यांच्या नात्याविषयी खुलेपणाने बोललेलं नाही. त्यामुळे आता ते कधी या नात्याविषयीची अधिकृत माहिती सर्वांसमोर आणतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

मलायका अरोरा ही अभिनेता, दिग्दर्शक अरबाज खान याची पत्नी होती. बऱ्याच वर्षांच्या वैवाविहक आयुष्यानंतर या दोघांनीही या नात्याला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला. वैवाहिक नात्यातून वेगळं झाल्यानंतर त्या दोघांनीही वेगळ्या वाटा निवडल्याचं पाहायला मिळालं.