अर्रsss! आधी प्रियकरानं साथ सोडली, नंतर ड्रेसनं.... किआरावर भर कार्यक्रमाच संकट

यावेळी मात्र तिचा हा ड्रेस तिची साथ देताना दिसला नाही.   

Updated: Apr 30, 2022, 12:51 PM IST
अर्रsss! आधी प्रियकरानं साथ सोडली, नंतर ड्रेसनं.... किआरावर भर कार्यक्रमाच संकट
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : रेड कार्पेट असो, किंवा एखादा खास कार्यक्रम, पार्टी... बॉलिवूड कलाकार आणि विशेष म्हणजे अभिनेत्री अगदी सुरेखपणे तयार होत स्टाईल स्टेटमेंट देत असतात. फॅशन ट्रेंड फॉलो करत या ट्रेंडना सुरेखपणे मिरवणाऱ्या या अभिनेत्रींकडे पाहताना त्यांची अदा आपली मनं जिंकते. 

अभिनेत्रींची स्टाईल स्टेटमेंट म्हणजे त्यांचे लूक. याच लूकचा अविभाज्य भाग म्हणजे त्यांचे आऊटफिट. कस्टमाईज, ट्रेंडी आणि सेलिब्रिटीं आर्टिस्टनं डिझाईन केलेल्या आऊटफिट्सना अभिनेत्री कायम पसंती देताना दिसतात. (kiara advani )

अभिनेत्री किआरा अडवाणी हिनंही अशाच एका ड्रेसला पसंती देत ती एका कार्यक्रमाला पोहोचली. पण, यावेळी मात्र तिचा हा ड्रेस तिची साथ देताना दिसला नाही. 

सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, तिथं किआरा चालत येत असतानाच तिच्या ड्रेसला असणारी कट सरकली आणि चारचौघांत तिला का. करावं हेच कळलं नाही. 

शेवटी तिनं कसाबसा तो कट व्यवस्थित केला, तितक्यातच तिची कुणीतरी सहकारी समोर आली आणि तिनं किआराच्या समोर येत प्रसंग सावरून नेण्याचा प्रयत्न केला. 

किआरासोबत घडलेला हा वॉर्डरोब माल्फंक्शनचा प्रसंग पाहिला असता, फॅशनच्या नादात अभिनेत्रींवर ही वेळही ओढावते हेच पुन्हा सिद्ध झालं. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x