जगातील सर्वात सुंदर अभिनेत्रींमध्ये 'या' एका भारतीय अभिनेत्रीचे नाव, सौंदर्य पाहून...

लंडन फेशियल प्लास्टिक सर्जरी सेंटरने जगातील सर्वात सुंदर अभिनेत्रींची यादी जाहीर केली आहे. या यादीत एका भारतीय अभिनेत्रीच्या नावाचाही समावेश आहे.

सोनेश्वर पाटील | Updated: Oct 19, 2024, 12:49 PM IST
जगातील सर्वात सुंदर अभिनेत्रींमध्ये 'या' एका भारतीय अभिनेत्रीचे नाव, सौंदर्य पाहून... title=

Top 10 most beautiful women in world:  बॉलिवडूमधील अनेक अभिनेत्री त्यांच्या अभिनयासोबत सौंदर्यामुळे देखील प्रचंड चर्चेत असतात. मात्र, एक संशोधन समोर आले आहे. ज्यामध्ये जगातील सर्वात सुंदर महिलांबद्दल सांगितले आहे. लंडन फेशियल प्लास्टिक सर्जरी सेंटरने जगातील सर्वात सुंदर अभिनेत्रींची यादी जाहीर केली आहे. या यादीत एका भारतीय अभिनेत्रीच्या नावाचाही समावेश आहे. त्यासोबत जगातील सर्वात सुंदर पुरुषांची देखील यादी जाहीर केली आहे. 

लंडन फेशियल प्लास्टिक सर्जरी सेंटरने जाहीर केलेल्या यादीत दीपिका पदुकोण आणि शाहरुख खान हे एकमेव स्टार आहेत. ज्यांनी टॉप 10 मध्ये प्रवेश केला आहे. 

जाहीर केलेली यादी कशाच्या आधारावर 

लंडन फेशियल प्लास्टिक सर्जरी सेंटरने जाहीर केलेली यादी ही गोल्डन रेशोच्या माध्यमातून तयार केल्याचा दावा संशोधनात करण्यात आला आहे. हे Phi (1.618) सूत्रानुसार मोजले जाते. कला, वास्तुकला आणि आता अगदी विज्ञानाप्रमाणे यामध्ये फी (1.618) च्या सर्वात जवळ कोण आहे हे पाहण्यासाठी तज्ञ चेहऱ्याची लांबी, वैशिष्ट्यांमधील अंतर इत्यादी मोजतात. 

टॉप 10 मध्ये दीपिका पदुकोणचा समावेश 

या यादीतील टॉप 10 मध्ये दीपिका पदुकोण ही एकमेव भारतीय अभिनेत्री आहे. जगातील सर्वात सुंदर महिलांच्या यादीत दीपिकाने 91.22% गुण मिळवून 9 वे स्थान पटकावले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

जगातील सर्वात सुंदर तरुण

तसेच गोल्डन रेशोच्या लिस्टमध्ये जगातील सर्वात सुंदर पुरुषांचा समावेश आहे. ज्यामध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या नावाचा समावेश आहे. अभिनेत्याला 86.76% गुण मिळाले आहेत. शाहरुख खान या यादीमध्ये 10 व्या स्थानावर आहे. या यादीतील तो एकमेव भारतीय अभिनेता आहे. 

जगातील सर्वात सुंदर महिला कोण? 

लंडन फेशियल प्लास्टिक सर्जरी सेंटरने जाहीर केलेल्या यादीत जगातील सर्वात सुंदर महिलांचा समावेश करण्यात आला आहे. ज्यामध्ये सर्वात सुंदर महिलेला 94.52 टक्के गुण मिळाले आहेत. या यादीत जेंडाया 94.37%, बेला हदीद 94.35%, बेयॉन्से 92.44% आणि एरियाना ग्रांडे 91.81% यांचा समावेश आहे.