मुंबई : भारतीय क्रिकेट संघात नावलौकिक मिळवणारा क्रिकेटपटू विराट कोहली सध्या इंडियन प्रिमीयर लीग IPL 2020 या स्पर्धेत व्यग्र आहे. दुबईमध्ये पार पडत असणाऱ्या या स्पर्धेसाठी त्याची पत्नी, अभिनेत्री अनुष्का शर्मा anushka sharma हिचीसुद्धा उपस्थिती पाहायला मिळत आहे. विराटसाठी हा सर्व काळच फारच महत्त्वाचा आहे, कारण येत्या काही महिन्यांमध्ये त्याची पत्नी अनुष्का ही एका गोंडस बाळाला जन्म देणार आहे.
अनुष्का गरोदरपणातही विराटला त्याच्या सामन्यांसाठी प्रोत्साहन देत असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅशन गोल्सही देत आहे. सध्याच्या काळात तिच्या फॅशन सेन्सची चांगलीच चर्चा होत असून, मॅटर्निटी फॅशन गोल्समुळं बी- टाऊनची ही सौंदर्यवती चर्चेचा भाग ठरत आहे.
अनुष्काचा असाच एक लूक काही दिवसांपूर्वी आयपीएलच्या एका सामन्यादरम्यान पाहायला मिळाला. ज्यावेळी स्टँडमध्ये उभी राहून कौतुकानं टाळ्या वाजवतानाची तिची काही छायाचित्रंही व्हायरल झाली. तेव्हा तिनं burnt orange रंगाची छटा असणारा एक ड्रेस घातला होता. एम्पायर वेस्ट आणि बटरफ्लाय स्लीव्ज असणाऱ्या या तिच्या ड्रेसला सोनेरी पट्टा असाऱ्या मनगटावरील घड्यानं आणि लूप रिंग्स प्रकारच्या कानातल्यांनी अधिक उठावदार केलं होतं.
अनुष्कानं ASOS DESIGN चा "Maternity midi tea dress in burnt orange" घातला होता. ज्याची किंमत £19.45 म्हणजेच भारतीय दरानुसार 1,873 रुपये इतकी आहे. त्यामुळं बहुतेकांच्या खिशाला हा ड्रेस परवडेल असं म्हणायला हरकत नाही.