बॉयफ्रेंडच्या वाढदिवशी अंकिताची रोमॅन्टिक पोस्ट

अंकिताने बॉयफ्रेंडच्या वाढदिवसानिमित्त काही फोटो शेअर आहेत.

Updated: Aug 2, 2019, 04:58 PM IST
बॉयफ्रेंडच्या वाढदिवशी अंकिताची रोमॅन्टिक पोस्ट title=

मुंबई : 'मणिकर्णिक : द क्विन ऑफ झांसी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावरुन ती बॉयफ्रेंड विकी जैनसोबतचेही अनेक फोटो शेअर करत असते. या फोटोला चाहत्यांची चांगली पसंतीही मिळते.

अंकिताने बॉयफ्रेंडच्या वाढदिवसानिमित्त काही फोटो शेअर आहेत. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर अंकिताने त्यांच्या नात्याचाही खुलासा केला आहे. 

 
 
 
 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on

बॉयफ्रेंड विकी जैनच्याच वाढदिवशी अंकिताच्या आईचाही वाढदिवस असतो. अंकिताने तिची आई आणि विकी जैनचा एक फोटो शेअर केला आहे. 'माझ्या आयुष्यातील दोन महत्त्वपूर्ण लोकांचा वाढदिवस' अशा आषयाची पोस्ट लिहित तिने दोघांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

याआधीदेखील अंकिताने विकीसोबतचे अनेक फोटो शेअर करत त्यांच्या नात्याच्या चर्चांना दुजोरा दिला आहे. 

 
 
 
 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on

अंकिता याआधी अभिनेता सुशांत सिंह राजपूतला डेट करत होती. दोघे लग्न करणार असल्याचीही चर्चा होती. मात्र, त्याआधीच त्याचे मार्ग वेगळे झाले.