हृतिकच्या गर्लफ्रेंडचं नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर

रिचा चढ्ढा आणि अली फजल यांच्या लग्नाच्या रिसेप्शनला हृतिक रोशन आणि सबा आझाद या जोडप्याने हजेरी लावली होती.

Updated: Oct 9, 2022, 09:32 PM IST
हृतिकच्या गर्लफ्रेंडचं नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर  title=

Saba Azad Reply to Trollers: सध्या बॉलीवूडमध्ये चर्चा आहे ती म्हणजे हृतिक रोशन आणि त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद हिची (Hritik Roshan and Saba Azad). या दोघांच्या अफेअरपेक्षा हृतिकच्या गर्लफ्रेंडच्या लुकचीच सर्वत्र चर्चा होते आहे. मध्यंतरी हृतिक रोशनच्या गर्लफ्रेंडला ती हृतिकपेक्षा फार लहान दिसते म्हणून प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. त्यावर सबानं काहीच भाष्य केलं नव्हतं परंतु आता एका नेटकऱ्याने तिला समोरूनच ट्रोल केल्यामुळे आणि तिच्याशी पंगा घेतल्यामुळे सबानं यावेळी ट्रोलरला सडेतोड (Saba Azad Trolled) उत्तर दिलं आहे. (Bollywood actress and hritik roshan girlfriend saba azad reply trollers who made fun of her look)

अलीकडेच रिचा चढ्ढा आणि अली फजल यांच्या लग्नाच्या रिसेप्शनला (Richa Chadda and Ali Fazal) हृतिक रोशन आणि सबा आझाद या जोडप्याने हजेरी लावली होती. या पार्टीत सबाने पारंपारिक हिरव्या रंगाचा पोशाख परिधान केला होता त्यात ती कमालीची सुंदर दिसत होती परंतु एका ट्रोलरला मात्र तिचं सौंदर्य खटलं अन् तिला वाईट भाषेत ट्रोल केलं. 

आणखी वाचा  - 'हर हर महादेव' चित्रपटातील भुमिकेबद्दल अभिनेता सुबोध भावेचा मोठा निर्णय

 रिचा चढ्ढा आणि अली फजल यांच्या लग्नाच्या रिसेप्शनला सबाने बॉयफ्रेंड हृतिकसोबत हातात हात घालून पोज दिली होती. या दोघांचे फोटोही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. (Hritik Roshan and Saba Azad Photos) काही यूजर्सनी या फोटोंवर सबा आझादला ट्रोल करायला सुरुवात केली, ज्याचे स्क्रीनशॉट नंतर सबाने शेअर केले आहेत. द्वेष करणाऱ्यांकडून तिला कोणत्या प्रकारचे मेसेज येत आहेत हे तिनं सांगितलं आहे. लोक तिचा किती द्वेष करतात? असा प्रश्न उपस्थित करत ट्रोल करणाऱ्यांनाही तिनं चोख प्रत्युत्तर दिले आहे.

अभिनेत्री आणि गायिका सबा आझाद हृतिक रोशनसोबतच्या आपल्या नात्यामुळं सध्या सतत चर्चेत असते. सध्या ती सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. पण तिनं ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले. तिनं एका यूजरच्या प्रोफाईलचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. ही एक मुलगी होती जी सबाला अतिशय घाणेरडे आणि घृणास्पद कमेंट करत होती.

आणखी वाचा - प्रेग्नंट आलियाला त्यानं Kiss केलं तेव्हा... घरचे झाले शॉक!

सबा आझादने युजरच्या कमेंटचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. त्या कमेंटमध्ये असे लिहिले होते की, “छी कितनी गंदी दिख रही हो.” ट्रोलच्या या आक्षेपार्ह कमेंटवर सबाने खरपूस समाचार घेत तुम्हाला मी आवडत नसेल तर अनफॉलो करा, असे सांगितले. यावरूनच सबानं तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक लांबलचक नोटही लिहिली आहे. (Saba Azad Instagram Post)

सबा आझादने लिहिले, "ही श्रुती आहे... साहजिकच तिला स्वतःवर जास्त प्रेम आहे. पण ती मात्र माझा अमर्याद द्वेष करतेय आणि तो शेअर करण्यासाठी ती मला फॉलो करतेय. तिच्यासारखे बरेच असे मी पाहिले आहेत पण तुम्ही श्रुतीसारखे होऊ नका. तुम्ही मला फोलो करण्यास पूर्णपणे मोकळे आहात पण श्रुतीला मात्र अनफोलो कसं करायचं हे माहिती नाही पण लवकरच ते तिला कळेल”

साबा आझादला हृतिक रोशनसोबत याआधीही खूप ट्रोल केलं गेलं आहे. लोक तिला हृतिकसमोर लहान मुलगी म्हणून चिडवतात आणि ट्रोल करतात.