सगळं ठीक, पण प्रेग्नंन्ट आलियाचं हे चाललंय काय? पाहून तुम्हीही संतापाल

बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट नेहमीच आपल्या हटके लुकसाठी चर्चेत असते. 

Updated: Oct 10, 2022, 09:13 PM IST
सगळं ठीक, पण प्रेग्नंन्ट आलियाचं हे चाललंय काय? पाहून तुम्हीही संतापाल title=

Alia Bhatt Spotted: आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. (Alia Bhatt and Ranbir kapoor Brahmastra Movie) या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. सध्या आलिया भट्ट आपल्या प्रेग्नंन्सीमुळं 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या प्रमोशननंतर फार कुठे पाहायला मिळत नाहीये परंतु नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून तुम्हाला नक्कीच संताप आल्याशिवाय राहणार नाही. गरोदरपणातही आलिया भट्ट शॉर्ट ड्रेस घालून घराबाहेर पडली आहे. त्यावरून सगळीकडेच चर्चांना उधाण आलं आहे. (bollywood actress alia bhatt spotted wearing expensive heels and pink mini dress fans reacts)

बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट नेहमीच आपल्या हटके लुकसाठी चर्चेत असते. त्यातून आता आलिया प्रेग्नंन्ट असल्यानं तिच्या मेर्टिनिटी फॅशनचंही सर्वत्र कौतुक होतं आहे. (Alia Bhatt Maternity Fashion) गरोदर असणारी आलिया भट्ट पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी मात्र कारणंही तसंच आहे. समोर आलेल्या फोटोंंमधून आलिया पिंक कलरच्या मिनी ड्रेसमध्ये दिसते आहे आणि तिनं सर्वात महागड्या चपल्याही घातल्या आहेत. 

आणखी वाचा - खिशात पैसे नाहीत म्हणून रेल्वेच्या शौचालयात लपून बसायचा 'हा' लोकप्रिय गायक

समोर आलेल्या माहितीनुसार, आलियानं घातलेल्या चपला या तीन हजार रूपयांच्या आहेत. आलियाचा गुलाबी ड्रेस तर सात हजार रूपयांचा होता. तर तिनं घातलेल्या एक्सेसरीजही महागड्या घातल्या होत्या. 

आलियाचं डोहाळे जेवण नुकतंच मुंबईत पार पडलं. (Alia Bhatt Baby Shower) तिनं या डोहाळे जेवणासाठी पिवळ्या रंगांची अनारकली घातली होती. तिच्या डोहाळे जेवणाला संपुर्ण कुटुंबियांनी हजेरी लावली होती. हे सर्व खास क्षण तिनं इन्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. आपल्या पतीसोबतचेही खास क्षण तिनं यावेळी शेअर केले होते. तिच्या या फोटोंवर प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला होता. 

आणखी वाचा - बॉलीवूडच्या 'या' लोकप्रिय अभिनेत्री करणार राजकारणात प्रवेश? पाहा कोणी केली भविष्यवाणी

आलिया भट्ट लवकरच तिच्या पहिल्या हॉलीवूडपटातून दिसणार आहे. हार्ट ऑफ स्टोन (Heart of Stone) हा तिचा इंग्लिश चित्रपट लवकरच प्रदर्शित होतोय. आलियाचे रॉकी और रानी की प्रेम कहानी (Rocky Aur Rani Ki Prem Kahani), जी ले जारा (Jee Le Jara) हे चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहेत.