मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt)नं करण जोहरच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पाहता पाहता महेश भट्ट यांच्या या लेकिनं तिच्या अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांचा उठून दाद देण्यास भाग पाडलं. वयाच्या मनानं आलियाचा अनुभव भल्याभल्यांना लाजवेल असाच. (Bollywood Actress Alia bhatt Doppelganger on the comparision between two)
फक्त रुपेरी पडद्यावरच नाही, तर सोशल मीडियावरही आलियाची चांगलीच हवा पाहायला मिळते. पण, आता तिच्या लोकप्रियतेला सोशल मीडियावर टक्कर देणारी कोणतरी आलिये. असं म्हणतात की तिसुद्धा आलियासारखीच दिसते.
विश्वास बसत नाहीये? एकदा तिला व्यवस्थित पाहा. नाकीडोळी असण्यासोबत गालावर पडणारी खळीही आलियासारखीच... हो ना? ती समोर आली रे आली, की 'अरेच्चा! ही तर आलिया... ' असं म्हणण्यापासून 'ती पाहा, आलियाची ड्युप्लिकेट' असं म्हणण्यापर्यंत बऱ्याच प्रतिक्रिया पाहायला मिळतात.
जिच्याबद्दल या सर्व चर्चा होतात, ती आहे सेलेस्टी बैरागी. ती मुळची आसामची. अभिनय जगतात सेलेस्टी पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. काही म्युझिक व्हिडीओमध्येही ती झळकली आहे. असं असलं तरीही प्रेक्षक मात्र तिला आलियाची ड्युप्लिकेट असंच म्हणताना दिसत आहेत.
सेलेस्टीला मात्र हे सर्व काही प्रमाणात खटकतं. 'मी आलिया भट्टसारखी दिसते. मलासुद्धा तिचं कौतुक वाटतं. मी तिच्यासारखी दिसत असले तरीही माझी स्वत:चीही ओळख आहे. मी मेहनत घेतेय, अभिनेत्री म्हणून नावारुपास येतेय. मलाही माझ्या आवडत्या अभिनेत्रीसोबत एक दिसत स्क्रीन शेअर करायचीये', असं ती एका मुलाखतीदरम्यान म्हणाली.
आलियासारखं दिसण्यापेक्षा आणि आलियाच्या नावानं ओळखलं जाण्यापेक्षा आपल्याला सेलेस्टी म्हणूनच ओळखावं असाच सूर तिनं आळवला.