त्या WhatsApp chat मुळं खळबळजनक खुलासा; ड्रग्ज डिलर्सच्या संपर्कात होती रिया

SSR Case ला एक वेगळं वळण मिळालं असल्याचं चित्र आहे.   

Updated: Aug 26, 2020, 09:45 AM IST
त्या WhatsApp chat मुळं खळबळजनक खुलासा; ड्रग्ज डिलर्सच्या संपर्कात होती रिया  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता Sushant Singh Rajput सुशांत सिंह राजपूत आत्हमत्या प्रकरणामध्ये अंमली पदार्थ, ड्रग्ज डिलर्स यांची नावं समोर येण्यास सुरुवात झाली, त्यानंतर आता अभिनेत्री रिया चक्रवर्ती म्हणजेच सुशांतची प्रेयसी असणाऱ्या या बी- टाऊन अभिनेत्रीच्या WhatsApp चॅटमुळं आणखी खळबळजनक खुलासा झाला आहे. ड्रग्ज डिलर गौरव आर्यासोबतचं रियाचं बोलणं सध्या व्हायरल झाल्यामुळं SSR Case ला एक वेगळं वळण मिळालं असल्याचं चित्र आहे. 

समोर आलेल्या या WhatsApp chatमध्ये रिया गौरवला एमडी म्हणजेच Methylenedioxymethamphetamine या अतिशय स्ट्राँग ड्रगविषयी विचारताना दिसत आहे. 'आपण स्ट्राँग ड्रग्जविषयी सांगावं तर, मी कधी त्यांचा वापर केलेला नाही', असं रियाचं २०१७ मधील बोलणं समोर आलं आहे. एमडीबाबत तुला काही ठाऊक आहे का, असंही तिनं विचारल्याचं कळत आहे. 

जया साहा नावाच्या एका व्यक्तीशीही ड्रग्जबाबत रियाचं बोलणं झाल्याचं उघड झालं आहे. ही व्यक्ती रियाच्या मित्रमंडळींपैकी एक असल्याचं म्हटलं जात आहे. २०२० च्या एप्रिल महिन्यास सॅम्युअल मिरांडा आणि रियामध्ये झालेलं बोलणंही अनेक मुद्द्यांना वाचा फोडत आहे. 

width: 640px; height: 1172px;

'रिया स्टफ बऱ्याच अंशी संपला आहे', असं तो रियाला सांगत असल्याचं हा चॅट वाचून कळतं. इतकंच नव्हे, तर 'आपण शौविकच्या मित्राकडून घेऊ शकतो का? पण त्याच्याकडे फक्त हॅश आणि बड आहे', असं बोलणंही समोर आलं आहे. शौविक हा रियाचा भाऊ आहे. ज्याच्याबद्दलही सॅम्युअल आणि रियामध्ये बोलणं झालं होतं.

width: 640px; height: 1150px;

 

ड्रग्जसंदर्भातील रियाचे हे चॅट पाहता या प्रकरणामध्ये अंमली पदार्थांचा वापरही झाला होता की नाही, हाच प्रश्न आता उपस्थित होत आहे. आयएएनएस या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार या प्रकरणी ड्रग्जचा वापर झाला आहे की नाही हे पडताळण्यासाठी आता Narcotics Control Bureau (NCB)ची मदत घेतली जाणार आहे.