दुसऱ्यांदा लग्न करण्यासाठी शाहिदची पत्नी सज्ज; कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया समोर

अचानक मीराला झालं तरी काय?

Updated: Aug 18, 2022, 08:11 AM IST
दुसऱ्यांदा लग्न करण्यासाठी शाहिदची पत्नी सज्ज; कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया समोर  title=
Bollywood Actor shahid kapoor wife mira rajput wants to marry him again watch video

मुंबई : बॉलिवूडशी थेट संपर्क नसतानाही अभिनेता  शाहिद कपूर (Shahid Kapoor) याच्याशी लग्न करत मीरा राजपूत (Mira Rajput) त्याच्या कुटुंबात आली. एक सून आणि एक पत्नी म्हणून मीरानं तिच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. मातृत्त्वाचं सुखही तिला मिळालं. 

जसजसा काळ जात होता, तसतसं मीराही या कलाजगामध्ये स्थिरावू लागली. शाहिदसोबत एखाद्या ठिकाणी जाणं असो किंवा मग मुलाखती देणं असो. नाही म्हटलं, तरी मीराही सेलिब्रिटी झाली. 

शाहिद आणि मीरा ही जोडी सेलिब्रिटी जोड्यांच्या यादीत अग्रस्थानी येत असतानाच आता म्हणे अभिनेत्याच्या पत्नीला दुसरं लग्न करायचं आहे. अचानक मीराला झालं तरी काय? त्या दोघांमध्ये सर्वकाही ठीक आहे ना? तुम्हालाही हाच प्रश्न पडला असेल. (Bollywood Actor shahid kapoor wife mira rajput wants to marry him again watch video )

या प्रश्नाचं उत्तर मीरानंच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या माध्मातून दिलं आहे. जिथं तिनं शाहिदलाच उद्देशून, मला तुझ्याशी लग्न करायचंय असं म्हटलं आहे. 'आइ थिंक आइ वॉना मॅरी यू' या गाण्यावर शाहिदसोबत डान्स करतानाचा एक Video तिनं शेअर केला आहे. 

मीराच्या आई- वडिलांच्या लग्नाचा 40 वा वाढदिवस असल्यामुळं हा आनंदाचा दिवस साजरा करण्यासाठी सर्व कुटुंबीय आणि शाहिद- मीरा एकत्र आले होते. तेव्हाते क्षण तिनं शेअर करत, त्याला भन्नाट कॅप्शनही दिलं आहे.