शाहरुख खानचा लेक आर्यन करतोय 'या' अभिनेत्रीला डेट? जाणून घ्या कोण आहे ती?

सध्या आर्यन खान हा एका अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. आता ही अभिनेत्री नेमकी कोण, याबद्दल आपण जाणून घेऊ. 

नम्रता पाटील | Updated: Apr 3, 2024, 06:25 PM IST
शाहरुख खानचा लेक आर्यन करतोय 'या' अभिनेत्रीला डेट? जाणून घ्या कोण आहे ती? title=

Aryan Khan Dating Larissa Bonesi : बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असलेला शाहरुख खानचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. शाहरुख खानची तिन्ही मुलं कायमच विविध कारणांनी चर्चेत असतात. शाहरुखचा मोठा मुलगा आर्यन खानचे वैयक्तिक आयुष्य सतत प्रसिद्धीझोतात असते. तो लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यातच आता आर्यन खानच्या लव्ह लाईफबद्दलची चर्चा रंगली आहे. सध्या आर्यन खान हा एका अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. आता ही अभिनेत्री नेमकी कोण, याबद्दल आपण जाणून घेऊ. 

शाहरुखचा लाडका लेक आर्यन खान हा ब्राझिलियन मॉडेल आणि अभिनेत्री लॅरिसा बोन्सीला डेट करत आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. आर्यन आणि लॅरिसाचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काही दिवसांपूर्वी लॅरिसा ही आर्यनच्या कपड्याचा ब्रँड असलेल्या जाहिरातीतही झळकली होती. या जाहिरातीत त्या दोघांची जबरदस्त केमिस्ट्री दिसली होती. यानंतरच आर्यन आणि लॅरिसा हे एकमेकांना डेट करत असल्याचे बोललं जात आहे. 

अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, आर्यन खान आणि लॅरिसा बोन्सी हे एका कार्यक्रमात एकत्र दिसले होते. आर्यन हा इन्स्टाग्रामवरही लॅरिसाला आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाला फॉलो करतो. तर लॅरिसादेखील आर्यनसोबतच गौरी खान, शाहरुख खान आणि सुहाना खानलाही फॉलो करते. विशेष म्हणजे लॅरिसाच्या आईच्या वाढदिवसानिमित्त आर्यन खानने D'YAVOL या ब्रँडकडून एक खास भेटवस्तूही पाठवली होती. लॅरिसाच्या आईने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत त्याचे आभार मानले होते. पण आर्यन खान किंवा लॅरिसाने अद्याप त्यांच्या रिलेशनवर शिक्कामोर्तब केलेला नाही. तसेच आर्यन किंवा खान कुटुंबाने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. 

कोण आहे लॅरिसा बोनेसी?

लॅरिसा बोनेसी ही ब्राझीलमधीवल प्रसिद्ध मॉडेल आणि नृत्यांगना आहे. 'देसी बॉईज' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील 'सुबह होने ना दे' या गाण्यात ती अक्षय कुमार आणि जॉन अब्राहमसोबत झळकली. याशिवाय ती टायगर श्रॉफ आणि सूरज पांचोलीसोबत काही म्युझिक व्हिडीओ अल्बमही दिसली आहे. लॅरिसा ही एक उत्तम नृत्यांगनाच नव्हे तर ती एक उत्तम कलाकारही आहे.

लॅरिसाने दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही काम केले आहे. 'नेक्स्ट ॲनी' आणि 'थिक्का' या दाक्षिणात्य चित्रपटात ती झळकली होती. त्यासोबतच सैफ अली खानच्या 'गो गोवा गॉन' या चित्रपटात तिने सहाय्यक अभिनेत्री म्हणून काम केले होते. लॅरिसाने प्रसिद्ध गायक गुरु रंधावा आणि टोनी कक्कड यांच्या गाण्यांवरही डान्स केला होता.