शाहरुखच्या लेकीने पुन्हा चुकवला काळजाचा ठोका

सुहानाच्या सौंदर्याने आतापासूनच अनेकजण घायाळ होत आहेत.   

Updated: Oct 15, 2019, 08:13 PM IST
शाहरुखच्या लेकीने पुन्हा चुकवला काळजाचा ठोका title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : बॉलिवूडमध्ये गेल्या काही काळापासून बऱ्याच स्टारकिड्सचा प्रवेश झाला आहे. हे पाहता कलाकारांची नवी फळीच तयार झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. यातच पुढील काही दिवसांमध्ये आणखी एक नावही जोडलं जाणार आहे. ते नाव म्हणजे, बॉलिवूडचा किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुख खान याच्या मुलीचं. अर्थात,  सुहाना खान हिचं. 

सुहाना बी- टाऊनमध्ये पदार्पण करण्यापूर्वी विविध कारणांनी चर्चेत आली आहे. एखाद्या मासिकासाठीचं फोटोशूट म्हणू नका किंवा मित्रमैत्रीणींसोबतची एखादी पार्टी म्हणू नका. प्रत्येक ठिकाणी तिचा नवा लूक दिसतो. मुख्य म्हणजे आतापासूनच तिचा असा वेगळा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. यातच भर म्हणजे सुहानाचा नवा फोटो. 

सोशल मीडियावर सुहानाच्या फॅनपेजवरुन शेअर करण्यात आलेल्या या फोटोने अनेकांच्याच काळजाचा ठोका चुकला आहे. या फोटोमध्ये ती काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सर्वांचं लक्ष वेधत आहे. स्वीट हार्ट नेकलाईनच्या या ड्रेसला तिने जोड दिली आहे शार्प आयलायनर, हलक्याशा आयशॅडो आणि लाल रंगाच्या लिपस्टीकची. 

सुहानाचा हा लूक सर्वांची मनं जिंकत असतानाच तिची मैत्रीणची हा मिरर सेल्फीमध्ये सुहानाला शोभून दिसत आहे. एकंदरच काय, तर सुहानाचा अंदाज आणि तिच्या नावाभोवती असणारं वलय पाहता शाहरुखची ही लाडकी लेक खऱ्या अर्थाने आता या वर्तुळात येण्यासाठी तयार झाली आहे, असं म्हणायला हरकत नाही.