सलमान खान एकटा पडलाय...; खास मित्राने मांडली व्यथा

 एका खास मित्रानं त्याच्याबद्दल चिंता व्यक्त करणारं वक्तव्य केलं आहे.   

Updated: Nov 2, 2021, 12:00 PM IST
सलमान खान एकटा पडलाय...; खास मित्राने मांडली व्यथा  title=
सलमान खान

मुंबई : अभिनेता सलमान खान लग्न कधी करणार हा प्रश्नच चाहते मागील कित्येक वर्ष उपस्थित करताना दिसत आहे. सलमानचे चाहते त्याच्या जोडीदारा पाहण्यासाठी उत्सुक आहेत. पण, अफेअर्सच्या चर्चांपलीकडे हा अभिनेता मात्र लग्नाचं नावच घेताना दिसत नाही. हे सारं सुरु असतानाच आता सलमानच्या एका खास मित्रानं त्याच्याबद्दल चिंता व्यक्त करणारं वक्तव्य केलं आहे. 

सलमान सध्या एकटा पडलाय, असं म्हणत त्याच्यासोबत आपलं नातं नेमकं कसं आहे यावरुन पडदा उचलणारा हा त्याचा खास मित्र म्हणजे चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते महेश मांजरेकर. 

सलमानचं लग्न न करणं त्यांच्यासाठी मोठी बाब असून, तो असं का करत नाहीये हाच प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.  

एका मुलाखतीमध्ये सलमानबाबत काही गोष्टी शेअर करत मांजरेकर म्हणाले, 'अनेकदा काय होतं, सलमानशी काही गोष्टी मी बोलू शकतो, ज्या इतर कोणीही बोलू शकत नाही. मला कायम असं वाटत असतं, किंबहुना मला आताही वाटतंय, मी त्याला बोलतोही की अरे तू लग्न करत नाहीस यावर माझी हरकत आहे. असं व्हावं हे मला नेहमी वाटत असतं. मला उद्याकडे सलमानचा मुलगा पाहायचा आहे.'

सलमान कायम या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, असं सांगत त्याला खरंच कोणाच्या तरी साथीची गरज आहे ही बाब त्यांनी या मुलाखतीत व्यक्त केली. सलमानचं एकटं असणं चाहत्यांप्रमाणेच महेश मांजरेकर यांनाही सतावतं. ज्यामुळं ते कायमच त्यानं लग्न करावं यासाठी आशावादी दिसतात.