Happy Birthday Govinda : 90 च्या दशकातली असे अनेक स्टार लोक आहेत जे अजूनही बॉलिवूडवर राज्य करत आहेत आणि नवीन कलाकार आले असले तरीही ते आपले चित्रपट हिट करत आहे. असाच एक लोकप्रिय अभिनेता गोविंदा (Govinda Birthday).. गोविंदाने आपल्या दमदार अभिनयाने आणि एकापेक्षा एक आव्हानात्मक भूमिका साकारत त्याने सिनेसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. गोविंदाच्या संपूर्ण कुटुंबाचे चित्रपटांशी घट्ट नाते आहे. त्याचे वडील आणि आई दोघेही चित्रपटांमध्ये अभिनेते आहेत. याशिवाय गोविंदाचा भाऊ अॅक्टिंग स्कूलमध्ये शिकवायचा. अशा परिस्थितीत गोविंदाच्या कुटुंबातील वातावरण नेहमीच कलेने भरलेले असे. अशा परिस्थितीत जेव्हा जेव्हा त्याला त्याच्या नृत्याच्या छंदाबद्दल विचारले जायचे तेव्हा तो म्हणत असे की मला अनेक गोष्टींची आवड आहे पण मी उत्तम नृत्य करतो.
'हिरो नं वन', 'कुली नं वन', 'पार्टनर' अशा एकापेक्षा एक धमाकेदार भूमिका साकारत अभिनेता गोविंदाने प्रचंड लोकप्रियता मिळवली. आजही त्याच्या या अभिनयाची चाहत्यांमध्ये चर्चा होताना दिसत असते. ९० च्या दशकातील सर्वात लोकप्रिय अभिनेता म्हणून गोविंदाची ओळख होती. या काळात त्याची लोकप्रियता इतकी होती की, एकावेळी त्याला 70 चित्रपटांची ऑफर आली होती.
वाचा : Instagram वर बनवा Recap Reel 2022, कसं ते जाणून घ्या...
एकाचवेळी अनेक चित्रपटची ऑफर
गोविंदाचा (Govinda) जन्म 21 डिसेंबर 1963 ला मुंबईमध्ये झाला. दरम्यान 1985-86 हा काळ होता जेव्हा गोविंदाची लोकप्रियता इतकी वाढली होती की त्याला एकाच वेळी 70 चित्रपट मिळाले. याबद्दलचा खुलासा स्वतः गोविंदाने एका मुलाखतीत बोलताना केला होता. या मुलाखतीत बोलताना गोविंदाने सांगितले की, "मला एकाचवेळी सत्तर चित्रपटांची ऑफर आली होती. हे खरे आहे परंतु त्यामधील अनेक चित्रपट सूरू होण्याआधीच बंद झाले. कारण अनेक चित्रपटांच्या तारखांचा प्रोब्लेम होता. ज्यामुळे त्याला वेळ देता येत नव्हते. इतकेच नव्हेतर या काळात एकाच दिवशी चार- चार चित्रपटाचे शुटिंग करत होता," असेही त्याने सांगितले.
योजना करू नका
जेव्हा जेव्हा गोविंदाला त्याच्या अचानक मिळालेल्या यशाबद्दल विचारले जायचे तेव्हा तो म्हणत असे की मी सुखात जास्त आनंदी नाही आणि दु:खात जास्त दुःखी नाही कारण मला माहित आहे की आज जे आहे ते उद्या नाही, जे उद्या आहे ते परवा नाही.
कारचा छंद
गोविंदा भले त्याचे भविष्य प्लॅन करत नसेल पण त्याला चांगले कपडे खूप आवडतात, याशिवाय 8-10 वाहने असावीत असे तो म्हणायचा.