प्रियकराला आयुष्यमान म्हणतोय, 'मेरे लिये तुम काफी हो....'

काही दिवसांपूर्वीच त्याच्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान' या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला

Updated: Feb 4, 2020, 01:27 PM IST
प्रियकराला आयुष्यमान म्हणतोय, 'मेरे लिये तुम काफी हो....' title=
Shubh Mangal Zyada Saavdhan

मुंबई : साचेबद्ध भूमिकांना शह देत काही अफलातून पात्र रुपेरी पडद्यावर जिवंत करणाऱा अभिनेता आयुष्मान खुराना Ayushman Khurana आता एका समलैंगिक तरुणाच्या भूमिकेत झळकणार आहे. काही दिवसांपूर्वीच त्याच्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान' या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला. जीतू के. याच्यासोबत आयुष्यमान या चित्रपटाच्या ट्रेलरच्या निमित्ताने पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला आला. 

एका अभिनेत्यासोबतच आयुष्यमानची ही ऑनस्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांना भलतीच भावली. किंबहुना या चित्रपटाविषयी चाहत्यांनी कुतूहलही व्यक्त केलं आहे. याच वातावरणात आता चित्रपटातील 'मेरे लिये तुम काफी हो' हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. 

एक सुरेख, कधीही न बोललं गेलेलं नातं या गाण्याच्या निमित्ताने पाहायला मिळत आहे. समलैंगिक नात्यांमधील भाव, समाजाचा होणारा विरोध आणि त्याचा या नात्यावर होणारा परिणाम या गाण्यातून पाहायला मिळत आहे. मुख्य म्हणजे नात्यावर होणाऱ्या परिणामांपेक्षा समलैंगिक व्यक्तींवर होणारे याचे परिणाम, त्यांच् खच्चीकरण नेमकं कशा प्रकारचं असू शकतं हेसुद्धा गाण्यातील काही दृश्य सांगून जातात. 

प्रेमाला सहसा समाजाचा विरोध असतो. पण, या परिस्थितीमध्येही आपल्या जवळच्या व्यक्तीची साथ असेल तर सारं जगच आपल्या बाजूनं असल्याचा आत्मविश्वास येतो. ही सुरेख भावना या गाण्यातून दाखवण्यात आली आहे. तनिष्क आणि वायूने संगीतबद्ध केलेलं हे गाणं, खुद्द आय़ुष्मान खुराना यानेच गायलं आहे. अतिशय सुरेख चाल आणि साजेशी, भावणारी दृश्य या गाण्याच्या जमेच्या बाजू. 

वाचा : 'बेसन बर्फी' बनवत नव्वदीपार आजीबाईंनी सुरु केला स्टार्टअप

एक वेगळीच प्रेमकहाणी आणि एक नवी जोडी घेऊन Shubh Mangal Zyada Saavdhan हा चित्रपट २१ फेब्रुवारीला  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून आयुष्मान आणि जीतू या कलाकारांशिवाय, गजराज राव, नीना गुप्ता, मानवी गग्रू, सुनीता राजवरसुद्धा झळकणार आहेत. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x