पाहा, कसं आहे अनिल कपूर यांचं 'झक्कास' घर....

व्हिडिओ पाहून तुम्हालाही हेवा वाटेल त्यांच्या घरातील या अनोख्या नात्यांचा....

Updated: Aug 3, 2020, 02:25 PM IST
पाहा, कसं आहे अनिल कपूर यांचं 'झक्कास' घर....  title=

मुंबई : कलाकारांच्या खासगी आयुष्याविषयी सततचं वाटणारं आकर्षण ही काही नवी बाब नाही. मुळात हा आकर्षणाचा विषय त्यांच्या घरांच्या बाबतीत जरा जास्तच बळावतो. म्हणजे आपला आवडता कलाकार नेमका कशा आणि किती मोठ्या घरात राहतो, त्याच्या घराती आखणी नेमकी कशी आहे असे असंख्य प्रश्न चाहत्यांच्या मनात घर करत असतात. याच प्रश्नांची उत्तर मिळत आहेत ती म्हणजे बी टाऊनमधील एव्हरग्रीन अभिनेता अनिल कपूर यांच्या घराची झलक पाहून.

अनिल कपूर यांचा मुलगा, हर्षवर्धन कपूर यानं रक्षाबंधनच्या निमित्तानं त्याच्या बहिणीसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये हर्षवर्धन त्यांच्या घराची सफर सर्वांनाच घडवून आणताना दिसत आहे. ज्यामध्ये त्याला साथ मिळत आहे ती म्हणजे बहीण रिया कपूर हिची.रिया आणि हर्षवर्धन त्यांच्या बालपणीच्या आणि कुटुंबासमवेतच्या काही आठवणी सांगत या घराची झलक सर्वांना दाखवत आहेत. ही झलक पाहताना कलाकारांच्या या कुटुंबात खुलणाऱ्या नात्यांचे बंध पाहून अनेकांना हेवाच वाटत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Growing up with siblings is one of the greatest blessings in life. They are our first best friends and the foes we can't live without. The most beautiful aspect of the sibling relation, however, is that no matter how old you grow, how distant you stay, and how busy or stressed you are, even the thought of being with your sibling(s) in the safety of your house takes all the stress away. It is one of the most refreshing and overwhelming feelings. The same is the bond that I have shared with my siblings all through my life. We have been together, from being partners in crime to pillars of strength for each other. @square_yards gave us this beautiful chance to relive our memories and has motivated us to make new ones this Raksha Bandhan. This was #MeriWaliHomeStory, and you can share yours too on www.squareyards.com #Rakhi #RakshaBandhan #Siblings #SiblingBond #Sister #Brother #SquareYards @rheakapoor

A post shared by Harsh Varrdhan Kapoor (@harshvarrdhankapoor) on

'मेरी वाली होम स्टोरी' असं लिहित भावंडांसोबत बालपण व्यतीत होणं, मोठं होणं हा जणू एक आशीर्वादच असल्याचं म्हणत हर्षवर्धननं बहीण- भावाच्या सुरेख नात्याला शब्दांत बांधण्याचा प्रयत्न केला आहे. ही अशी मंडळी असतात जे आपले पहिले खास मित्र असतात, असे मित्र ज्यांच्यापासून वेगळं होऊन जगणं म्हणजे तसं कठीणच. याच नात्याच्या बंधात असताना एका वेगळ्याच आणि परिपूर्ण अशा भावनेची जाणीव होते. ही जाणीव मन व्यापणारी असते असंही त्यानं या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. 

चित्रीकरण, व्यग्र वेळेपत्रक, त्यात सेलिब्रिटी कुटुंब म्हणजे अनेकदा एकमेकांची भेट होणंही कठीण. पण, यातही अनिक कपूर यांचं कुटुंब या 'झक्कास' घरामध्ये ही नाती जपत जणू इतरांना आदर्शच देत आहेत असं म्हणायला हरकत नाही.