Akshay Kumar on Alka Bhatia: सध्या अक्षय कुमारचा 'रक्षाबंधन' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आता सोशल मीडियावर रणकंदन माजले आहे. याचे कारण boycott बॉलीवूड हा ट्रेण्ड आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे आणि या ट्रेण्डमध्ये अक्षय कुमारचा 'रक्षाबंधन' हा चित्रपटही अडकला आहे. त्यामुळे सध्या या चित्रपटाला सगळीकडून दणाणून विरोध होतो आहे पण हा विरोध सुरू असतानाच अक्षय कुमार सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
या चित्रपटाचा विषय बहिण भावाच्या नात्याचा असल्याने यानिमित्ताने अक्षयने आपल्याही जवळच्या व्यक्तीसोबतच्या नात्याबद्दलचा खुलासा केला आहे. बॉलीवूड स्टार अक्षय कुमार याने आपली बहीण अलक भाटिया हिच्याशी असणारे आपले नाते शेअर केले आहे. आपल्या बहिणीविषयी अक्षयने चार कौतुकाचे शब्द उदगारले आहेत. ''आमच्यात एक अनोखं नातं आहे. प्रत्येकाचीच बहीण ही भावासाठी एक चांगली मैत्रीण असते तशीच ती माझीही आहे. तिच्या खांद्यावर डोकं ठेवून मीही माझ्या आयुष्यातील सर्व सुखदुःख शेअर करतो. ती माझ्यासाठी कायम तत्पर असते.'', अशी स्तुती आपल्या बहीणबद्दल अक्षयने केली.
आपली बहीण अलका हिच्याबद्दल बोलताना तो पुढे म्हणाला, ''रक्षाबंधनाच्या दिवशी मी लवकर उठायचो त्याचबरोबर शाळेतून त्या दिवशी सुट्टी घ्यायचो नाही, अशी माझी रक्षाबंधनची आठवण आहे. आम्ही दोघे कॅथलिक शाळेत शिकलो. शाळेतून आम्हा सुट्टी मिळायची नाही.''
''सकाळी लवकर आमच्याकडे जेवायला बसण्याचा रिवाज आहे तेव्हा अलका मला राखी बांधते आणि मी तिचे आशीर्वाद घ्यायचो. माझे वडील मला थोडे पैसे द्यायचे जे मी माझ्या बहिणीला द्यायचो. रक्षाबंधन आम्ही आजही अशीच साजरी करतो यात काहीच बदल झालेला नाही. आजही मी सकाळी लवकर उठून माझ्या बहिणीच्या घरी जातो.'',अशी भावना अक्षय कुमारने मांडली.
अक्षय कुमारचा 'रक्षाबंधन' हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी म्हणजेच राखी सेलिब्रेशनच्या दिवशी रिलिज होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत भूमी पेडणेकर, सादिया खतीब, सहजीन कौर, स्मृती श्रीकांत आणि दीपिका खन्ना यांच्याही भूमिका आहेत.