VIRAL VIDEO : बी टाऊनचं नवं कपल? 'तिनं' आदित्य रॉय कपूरकडे पाहताच झाली नात्याची पोलखोल

Entertainment News : प्रेमात असणाऱ्यांना कशाचीही चिंता नसते असं म्हणतात तेव्हा कधीकधी अतिशयोक्ती वाटते. पण, प्रत्येक वेळी ही अतिशयोक्ती नसते. असं का? सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून तुमच्या लगेचच लक्षात येईल 

Updated: Feb 1, 2023, 09:46 AM IST
VIRAL VIDEO : बी टाऊनचं नवं कपल? 'तिनं' आदित्य रॉय कपूरकडे पाहताच झाली नात्याची पोलखोल  title=
Bollywood Actor Aditya roy kapur and actress shobhita dhulipalas private moments captured watch video

Entertainment News : बॉलिवूडमध्ये (Bollywood) नाती तयार व्हायला आणि त्या नात्यांना तडा जायला एक क्षणही पुरेसा असतो. आजवर या बी टाऊनमध्ये अनेक कलाकारांनी त्यांच्या जोडीदारासोबत मोठा प्रवास केला. काहींची नाती या प्रवासातच विरली आणि काहींची आणखी घट्ट झाली. काहींना या प्रवासात नवे सोबतीही मिळाले. अशा या नात्यांच्याही अनोख्या विश्वात आता एका नव्या जोडीची चर्चा आहे. आता ही जोडी नेमकी प्रत्यक्ष आयुष्यातही एकमेकांची साथ देणार का? हाच प्रश्न चाहते विचारताना दिसत आहेत. 

एक नवं नातं आकारास येतंय? 

बॉलिवूड अभिनेता (Aditya roy kapur) आदित्य रॉय कपूर याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक सौंदर्यवती तिच्या महागड्या कपड्यांनीच आदित्यचे Sunglasses पुसताना दिसत आहे. बरं तिनं ते पुसून दिल्यानंतर आदित्य खोडकरपणे त्यावर डाग असल्याचं तिला सांगतो आणि तिसुद्धा त्याच्याकडे खोडकरपणे पाहते आणि हळुच हसते. 

हेसुद्धा वाचा : Shubman Gill च्या 'Sara 'चे खासगी फोटो VIRAL, सोशल मीडियावर एकच धुमाकूळ

व्हिडीओ (Viral Video) पाहताना त्या दोघांमध्ये असणारे नातेसंबंध लगेचच लक्षात येत आहेत. पण, आता त्यांच्या या नात्याला नेमकं काय नाव द्यावं? मैत्री की... असाच प्रश्न अनेकांना पडत आहे. आदित्यसोबत व्हिडीओमध्ये दिसणारी ही सौंदर्यवती आहे अभिनेत्री शोभिता धुलीपाला (Shobhita dhulipala). 

नागा चैतन्यसोबतच्या नात्यामुळं एकच चर्चा 

दक्षिणात्य कलाजगतातील सेलिब्रिटी कपल (Samantha Ruth Prabhu) समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य (Naga Chaitanya) यांच्या नात्यात दुरावा आल्यानंतर या अभिनेत्याचं नाव शोभिताशी जोडलं गेलं. किंबहुना नागा आणि तिची वाढती जवळीकच नात्याला तडा जाण्यास कारणीभूत होती असंही म्हटलं गेलं. ज्यानंतर नागा आणि शोभिताच्या 'खास' मैत्रीनं वेळोवेळी नजरा वळवल्या. पण आता मात्र हीच शोभिता आदित्य रॉय कपूर याच्याशीही असंच काहीसं नातं जपताना दिसत असल्यामुळं चर्चांनी जोर धरला आहे. 

आदित्य आणि शोभिता एकत्र का दिसतात? 

गेल्या काही दिवसांपासून आदित्य आणि शोभिता त्यांच्या आगामी 'द नाईट मॅनेजर' या प्रोजेक्टच्या प्रमोशनसाठी एकत्र दिसत आहेत. यासाठीच्या बऱ्याच प्रमोशनल अॅक्टिव्हिटीमध्ये त्यांचा सहभाग पाहायला मिळत आहे. अशाच एका कार्यक्रमाला गेलं असता तिथं आपल्याच धुंदीत असणाऱ्या या दोन्ही सेलिब्रिटींनी सर्वांच्याच नजरा वळवल्या. कॅज्युअल आऊटफिटमध्ये दिसलेल्या या जोडीनं यावेळी त्यांच्या मैत्रीपूर्ण नात्यानं काही चर्चांना वावही दिला. आता याच चर्चांना नेमकं कोणतं वळण मिळणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.