मुंबई : रणवीर सिंग त्याच्या भूमिकेप्रमाणे स्वतःमध्ये बदल करतो. हे बदल त्याच्या बॉडीट्रान्सफरर्मेशनपासून भूमिकेच्या बोलण्या चालण्याच्या प्रकारावर आहे. म्हणूनच दिल्लीतील एक मुलगा आणि बाजीराव आणि आता अगदी अल्लाउद्दीन खल्जीच्या भूमिकेतील रणवीर सिंग लोकांच्या खास लक्षात राहतो.
संजय लीला भंसाळीच्या 'पद्मावत' चित्रपटामध्ये रणवीर सिंग अल्लाउद्दीन खिल्जीची भूमिका साकारणार आहे. रणवीरने या भूमिकेसाठी शरीरावर विशेष मेहनत घेतली होती. अनेक वाद विवादांचे अडथळे पार करून हा चित्रपट 25 जानेवारीला रिलिज होणार आहे.
अल्लाउद्दीन खिल्जीनंतर रणवीर सिंग त्याचा आगामी चित्रपट 'गली बॉय'मध्ये झोपडपट्टीमध्ये राहणार्या मुलाची भूमिका साकारणार आहे. त्यासाठी त्याने वजन घटवले आहे. रणवीर सिंहचे हे बॉडी ट्रान्सफरमेशन अनेकांना प्रेरणादायी ठरणार आहे.
रणवीर सिंहने त्याचे खास फोटो सोशल मीडियामध्ये शेअर केले आहेत.
#padmaavat —> #gullyboy pic.twitter.com/6GFJAzPChf
— Ranveer Singh (@RanveerOfficial) January 19, 2018
'गली बॉय' चित्रपटाचे दिग्दर्शन जोया अख्तर करणार आहे. 'दिल धडकने दो' या चित्रपटानंतर रणवीर जोयासोबत काम करत असलेला हा दुसरा चित्रपट आहे. रणवीर सिंग या चित्रपटात एका सामान्य मुलाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. झोपडपट्टीतील एका मुलाचा प्रवास ' रॅपर' पर्यंत कसा होतो. हे पाहणं खास ठरणार आहे. शरीरावर मेहनत घेण्याप्रमाणेच रणवीर सिंहने दाढी आणि मिशीदेखील काढली आहे.