Bobby Deol : बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या 'ॲनिमल' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तर आज त्याचं चर्चेत असण्याचं कारण काही दुसरंच आहे. ते म्हणजे त्याचा वाढदिवस. आज बॉबी देओलचा 56 वा वाढदिवस आहे. बॉबी देओलचा फक्त चित्रपट नाही तर त्याचं खासगी आयुष्य देखील तितकंच चर्चेत राहिलं आहे. एकदा तर बॉबी कायद्याच्या कचाट्यात अडकला होता. तो काळ त्याच्यासाठी फार कठीण होता. चला जाणून घेऊया बॉबीचा तो किस्सा...
बॉबी देओलचं लग्न तान्या आहूजाशी झालं होतं. दोघांची भेट एका रेस्टॉरंटमध्ये झाली होती. तान्याला पहिल्यांदा पाहताच बॉबी तिच्या प्रेमात पडला होता. तर तान्याचे वडील हे बॅंकर होते. तान्या आणि बॉबीनं 1996 मध्ये पंजाबी परंपरेनं लग्न केलं. तान्या ही एक फॅशन डिझायनर आहे. तान्याचं कुटुंब देखील तितकंच श्रीमंत आहे. तिचे वडील फक्त करोडपती बॅंकर नव्हते तर त्यासोबत ते मॅनेजिंग डायरेक्टर देखील होते. तान्याचं मुंबईतील घर हे 5000 स्केवअर फीट एरियाचं होतं.
तान्यानं फर्स्ट लेडीजला एक मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत तान्यानं लग्नानंतर तिचं आयुष्य कसं बदललं हे सांगितलं. ती म्हणाली होती की ती एका व्यवसाय करणाऱ्या कुटुंबातून आहे आणि अचानक एका फिल्मी कुटुंबात आली. त्यामुळे तिचं आयुष्य पूर्णपणे बदललं. कारण बिझनेसमध्ये तुमची एक फिक्स अशी शिफ्ट आहे. तर चित्रपटांमध्ये असं काही नसतं.
बॉबीसोबत लग्न झाल्याच्या काही काळानंतर तान्याला तिचे वडील देवेंद्र आहूजा यांच्या अफेअरविषयी कळालं. तिच्या वडिलांचं अफेअर एका एअरहोस्टेससोबत होतो. त्यामुळे तिच्या कुटुंबात खूप तनावाचं वातावरण निर्माण झालं होतं. तिचा भाऊ विक्रम आणि बहीण मोनीषानं त्यांच्या वडिलांच्या या नात्याला विरोध केला होता. मात्र, तान्या आणि बॉबीनं त्यांना पाठिंबा दिला.
देवेंद्र आहुजा हे बॉबी देओल आणि तान्या यांच्यावर जास्त प्रेम करत होते. त्याचे कारण म्हणजे त्यांनी त्या दोघांना पाठिंबा दिला होता. असं देखील म्हटलं जातं होतं की त्यांनी मुलगा विक्रमला प्रॉपर्टीतून काढून टाकलं. काही रिपोर्ट्नसमध्ये, तर हे देखील सांगितलं होतं की तान्याच्या वडिलांनी त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी मुलाला त्यांच्यापासून लांब ठेवण्यास आधीच सांगितले होते. बॉबी देओलच्या मेहुण्यानं त्याच्यावर प्रॉपर्टी हडपण्याचा आरोप केला होता. वडिलांच्या निधनानंतर विक्रमनं कोर्टात खटला दाखल करत बॉबी आणि त्याच्या पत्नीवर आरोप केला होता की त्या दोघांनी प्रॉपर्टी हडपली. यावेळी त्यानं तब्बल 300 कोटींची प्रॉपर्टी हडपल्याचे म्हटले होते. त्यामुळे अनेक वर्ष हा खटला सुरु होता.