नवी दिल्ली : ‘बिग बॉस’ची स्पर्धक म्हणून लोकप्रिय झालेली बॉबी डार्लिंग ऊर्फ पाखी शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बॉबी डार्लिंगने तिच्या पतीवर गंभीर आरोप लावत तक्रार दाखल केली आहे.
पती मला मारतो आणि अनैसर्गिक शारिरीक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करतो, असा आरोप बॉबीने पतीवर लावला आहे. बॉबीने गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात भोपाळचा उद्योगपती रमणीक शर्मासोबत लग्न केलं होतं.
टाईम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार, बॉबी डार्लिंग आणि रमणीकने ११ फेब्रुवारीला गुपचुप भोपाळमध्ये लग्न केलं होतं. आता बॉबीने तिचा पती रमणीकवर दिल्ली पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे तिचा पती अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे.
बॉबीने सांगितले की, ‘रमणीक हा दारूच्या नशेत मला मारतो आणि दुस-या पुरुषांसोबत अफेअर असल्याचा आरोप करतो. त्याने माझी प्रॉपर्टी आणि पैसे काढून घेतले. सोबतच माझ्यावर दबाव टाकतो की, मुंबईतील फ्लॅटमध्ये मी त्याला को-ओनर बनवावं. लग्नानंतर रमणीकने माझ्याच पैशांनी एसयूव्ही कार खरेदी केली होती. आता माझ्याकडे काहीच नाहीये’.
बॉबीच्या म्हणण्यानुसार, ‘रमणीक सोसायटी सिक्युरिटीला पैसे देत होता, जेणेकरून तो माझ्याबाबतीत माहिती त्याला देऊ शकेल. तो माझ्यावर नजर ठेवत होता. मी त्याला घटस्फोटाचा प्रस्ताव दिलाय, मात्र त्याआधी त्याला माझी प्रॉपर्टी परत करावी लागेल. मी ही प्रॉपर्टी वाचवून मुंबईत शिफ्ट होणार आहे’.
तर या सर्व प्रकरणावर रमणीकचं म्हणणं आहे की, ‘बॉबी खोटं बोलत आहे. ती माझे प्रॉपर्टी पेपर, गोल्ड आणि पैसे घेऊन पळाली होती. मी तिच्याविरोधात तक्रार दिली आहे’. रमणीक हा बॉबी डार्लिंगपेक्षा १५ वर्षांनी लहान असल्याचे सांगितले जाते. बॉबी ट्रान्सवुमन आहे २०१० मध्ये बॉबी डार्लिंगने सेक्स जेंडर चेन्च केला होता.