काश्मीरमधील 'त्या' एका रात्रीनंतर राखी- गुलजार यांच्या नात्यात 'आँधी'; पाहा नेमकं काय बिनसलं...

राखी यांनी लग्नानंतर रुपेरी पडद्यापासून दुरावा पत्करला, पण...   

Updated: Aug 18, 2021, 07:51 PM IST
काश्मीरमधील 'त्या' एका रात्रीनंतर राखी- गुलजार यांच्या नात्यात 'आँधी'; पाहा नेमकं काय बिनसलं...  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : शब्दांशी खास नातं जपणाऱ्या लेखक, गीतकार आणि दिग्दर्शक गुलजार (gulzar) यांचा आज वाढदिवस. रुपेरी पडद्यापासून ते अगदी खासगी आयुष्यापर्यंत प्रत्येक बाबतीत गुलजार यांनी त्यांचं वेगळेपण सिद्ध केलं. मग ती त्यांच्या लेखणीतून उतरलेली गीतं असो किंवा त्यांच्या मुलीचं नाव असो. 

गुलजार आणि अभिनेत्री राखी यांचं नातं सर्वांना हेवा वाटेल असं असतानाच या नात्यात वादळ आलं आणि हा नात्यांचा महाल ढासळला. पण, त्याचा पाया मात्र आजही टिकून आहे. 1973 मध्ये गुलजार (Gulzar) आणि राखी (Rakhi) विवाहबंधनात अडकले होते. राखी यांनी लग्नानंतर रुपेरी पडद्यापासून दुरावा पत्करला. 

Vicky Kaushal नं Katrina Kaif ला असं केलं प्रपोज; व्हिडीओ तुफान व्हायरल 

 

एका रात्रीनं बदललं नातं... 
'आँधी' या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गुलजार काश्मीर येथे गेले  होते. त्यावेळी राखीसुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित होत्या. त्यादरम्यानच एके रात्री चित्रपटाची पूर्ण स्टारकास्ट आणि क्रू एकत्र बसले होते. ज्यावेळी संजीव कुमार, सुचित्रा सेन यांची उपस्थिती होती. असं म्हटलं जातं की त्यावेळी संजीव कुमार इतके मद्यधुंद अवस्थेत होते की, सुचित्रा सेन आपल्या खोलीत जात असतानाच त्यांनी त्यांचा हात धरला होता. हे सारं पाहून सुचित्रा सेन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तेव्हाच गुलजार यांनी मध्यस्थी करुन परिस्थिती सांभाळली. ते सुचित्रा सेन यांना सोडण्यासाठी त्यांच्या खोलीपर्यंत गेले. जेव्हा ते आपल्या खोलीत परतले तेव्हा राखी यांनी त्यांच्यापुढे अनेक प्रश्न उपस्थित केले. सुचित्रा यांना सोडण्यासाठी ते खोलीपर्यंत का गेले असा प्रश्न त्यांनी केला. राखी यांचा हा असा हस्तक्षेप गुलजार यांना संताप देऊन गेला. असंही म्हटलं जातं की याच कारणामुळे गुलजार यांनी रागाच्या भरात राखी यांच्यावर हातही उचलला होता, ज्यामुळं या प्रसंगाचा राखी यांच्या मनावर मोठा परिणाम झाला. 

गुलजार आणि राखी यांच्या नात्यात दुरावा आला, पण मुलगी मेघना हिच्याखातर या जोडीनं आजवर घटस्फोट घेतला नाही. आजही ही जोडी उतारवयात एकमेकांच्या पडत्या काळात मित्रत्वाचं नातं विभावताना दिसते.