Bigg Boss 14 : रूबीना दिलॅकने जिंकली ट्रॉफी आणि ३६ लाख रुपये

पहिल्यांदा व्यक्त केली ही भावना 

Updated: Feb 22, 2021, 10:59 AM IST
Bigg Boss 14 : रूबीना दिलॅकने जिंकली ट्रॉफी आणि ३६ लाख रुपये  title=

मुंबई : अखेर चाहत्यांच्या मनातील प्रश्नाला उत्तर मिळालं आहे. बिग बॉस १४ चा विजेता जाहीर करण्यात आला आहे. सगळ्या स्पर्धकांवर मात करत रुबीना दिलेकने बिग बॉस १४ ची ट्रॉफी जिंकली आहे. होस्ट सलमान खानने विजेतीचं नाव घोषित केलं आहे. रूबीनाला ३६ लाखांचा धनादेश मिळाला आहे. 

रुबीनाने आतापर्यंत खूप चांगल्याप्रकारे खेळ खेळला आहे. नवरा अभिनव शुक्लासोबत तिने बिग बॉसच्या घरात प्रवेश केला खरा पण ती कायमच स्वतःच्या डोक्याने खेळ खेळली. एवढंच नव्हे तर तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे तिने बिग बॉसला देखील स्पष्ट प्रश्न विचारले. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rubina Dilaik (@rubinadilaik)

बिग बॉसमध्ये शेवटी ५ स्पर्धक मिळाले. यामध्ये रुबीना, निक्की तंबोली, अली गोनी, राहुल वैद्या आणि राखी सावंत यांचा समावेश होता. या पाच जणांमध्ये अतिशय चांगला खेळ रंगला. 

१४० दिवस सुरू होता हा खेळ ३ ऑक्टोबर २०२० रोजी बिग बॉस १४ चा सिझन ऑनएअर गेला. खूप दिवसांपासून या शोची वाट पाहिली जात होती. हा कार्यक्रम एकूण १३८ दिवस चालला.