मुंबई : सलमान खानचा शो बिग बॉसला आता आणखी दिलचस्प आणि मजेशीर बनविण्यासाठी खास प्रयत्न केले जात आहेत. आणि अशावेळी शोमध्ये आणखी चांगले बदल केले जात आहेत.
ज्यामुळे शोचा फॉर्मेट देखील बदलणार आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बिग बॉस ११ मध्ये एक नाही तर दोन घरं असणार आहेत. म्हणजे यावेळी बिग बॉसमधील लोकांना शेजारी मिळणार आहेत. या कॉन्सेप्टमुळे प्रेक्षकांना नक्कीच वेगळी गम्मत येईल यात शंकाच नाही. शोची थिम देखील पडोसी म्हणजे शेजारी अशी ठेवली आहे. एवढंच नाही तर बिग बॉसमध्ये प्रवेश मिळविण्याची यंदा सामान्य लोकांना देखील संधी आहे. आणि याची सोशल मीडियावर खास चर्चा आहे.
'आम आदमी' ला मिळणार नाहीत पैसे....
असं सांगितलं जातं आहे की, बिग बॉस ११ मध्ये सहभागी होणाऱ्या सामान्य लोकांना कोणतेही मानधन मिळणार नाही. हे लोकं मोफत बिग बॉसशी जोडले जाणार आहेत. त्याचप्रमाणे हे सामान्य कंटेस्टेंट्स बिग बॉसच्या घरात होणाऱ्या टास्क आणि चांगल्या टीआरपीमुळे काही स्पेशल बोनसमध्ये पैसे कमवू शकणार आहेत.
बिग बॉस ११ असणार फॅमिली क्लास
बिग बॉस यावेळी अशा स्पर्धकांचा शोध घेत आहेत. जे एका कुटुंबाशी निगडीत असतील. त्यामुळे अशा काही स्पर्धकांना आणि त्यांच्या फॅमिलीला सिलेक्ट देखील करण्यात आलं आहे. जे बिग बॉसच्या घरात एकमेकांशीच लढताना आपल्याला दिसतील. आपल्याला आताच्या या शोमध्ये आई-मुलगी, बाप- मुलगा आणि बहिण- भाऊ आपल्याला या शोमध्ये दिसणार आहेत.
बिग बॉस ११ चा लोगो झाला जाहीर
बिग बॉस च्या ११ वे सिझन सप्टेंबरमध्ये ऑन एअर जाणार आहे. यावेळी शोचा नवा लोगो देखील जाहीर केला जाणार आहे. बिग बॉसच्या ऑफिशिअल पेजवरून हा लोगो शेअर केला आहे. ज्याला लोकांना चांगलीच पसंती दिली आहे.
हे लोकं असू शकतात बिग बॉसचे स्पर्धक
असं ऐकायला मिळालं आहे की, यंदा बिग बॉसमध्ये कॅनाडातील बेस्ट फिटनेस व्हिडिओ ब्लॉगर नवप्रीत बंगा देखील स्पर्धकांमध्ये आहे. सोशल मीडियावर प्रियंका चोप्राची डुबलिकेट म्हणून लोकप्रिय आहे. तसेच अंचित कौर, नंदीश संधू, रिया सेन, अभिषेक मलिक, मिष्टी चक्रवर्ती, मोहित मल्होत्रा, नवनीत कौर ढिल्लन आणि जोया अफरोज यासरखे स्पर्धक सहभागी आहेत.