Fact Check : कुशल बद्रिके आणि भाऊ कदम वादाच्या भोवऱ्यात; टिंगलटवाळी प्रकरणी कलाकारांना अटक?

झी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध कार्यक्रम चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाने घराघरात आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे.

Updated: Oct 1, 2022, 07:35 PM IST
Fact Check : कुशल बद्रिके आणि भाऊ कदम वादाच्या भोवऱ्यात; टिंगलटवाळी प्रकरणी कलाकारांना अटक? title=

मुंबई : झी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध कार्यक्रम चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाने घराघरात आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. या कॉमेडी शो च्या माध्यमातून भाऊ कदम (Bhau Kadam) आणि कुशल बद्रिके (Kushal Badrike) घराघरात पोहचले. नेहमी चर्चेत असलेल्या या जोडीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. खरंतर हा व्हिडिओ जुना आहे. पण हा व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. 

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये भाऊ आणि कुशल या दोघांविरुद्ध माजी पोलीस अधिकाऱ्याने तक्रार दाखल केली आहे. पांडू सिनेमात पोलिसांची टिंगलटवाळी केल्या प्रकरणी तक्रार दाखल केल्याचं समजतंय. भाऊ आणि कुशल या दोघांनी पांडू सिनेमात पोलीसाची भूमिका साकारली आहे. ज्यांनी खळखळून लोकांचं मनोरंजन केलं, त्यांच्यावर संकट ओढावलं आहे. 

नक्की प्रकरण काय?
सेटवर अनेक कलाकार स्क्रिपटसह तयारी करत बसलेले असताना पोलीस सेटवर आले. अचानक काय झालं म्हणून सर्वांचीच तारांबळ उडाली. सेटवर आलेल्या पोलिसांनी भाऊ आणि कुशल विरुद्ध माजी पोलीस अधिकाऱ्याने या दोघांविरुद्ध तक्रार दाखल केल्याचं सांगितलं. त्यामुळे या दोघांना सेटवरुन बाहेर जावं लागलं. सेटच्या बाहेर या अभिनेत्यांचं पोलिसांसोबत चर्चा झाली. यानंतर ते सेटवर परतले. 

भाऊ आणि कुशलने आपली बाजू पोलिसांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. पोलीस अधिकारी आणि या दोन्ही अभिनेत्यांचं बोलणं सुरु असतानाच निलेश साबळेंनी मध्यस्थी केली. तुम्हाला काय वाटलं पोलीस तुम्हाला घेऊन जातील का? घाबरु नका, हे खरे पोलीस नाही.  हा प्रँक आहे, असं कार्यक्रमाचा दिग्दर्शक निलेश साबळेने सांगितलं. यानंतर भाऊ आणि कुशलचा जीव भांड्यात पडला. हा सर्व प्रकार कार्यक्रमाचाच एक भाग आहे. हा प्रँकचा पुन्हा एकदा व्हायरल होत आहे.