प्रेग्नेंट भारती सिंगसोबत पतीने असं काय केलं? की कॉमेडियन भर रस्त्यात रडली

नंतर हर्षला त्याची चूक लक्षात आली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

Updated: Feb 18, 2022, 02:37 PM IST
 प्रेग्नेंट भारती सिंगसोबत पतीने असं काय केलं? की कॉमेडियन भर रस्त्यात रडली  title=

मुंबई : 14 फेब्रुवारीला सगळ्यांनी व्हॅलेंटाईन डे साजरा केला. अनेक सेलिब्रिटींनी ही या दिवशी आपल्या जोडीदारासोबत पोस्ट शेअर करत आपलं प्रेम व्यक्त केलं.पण अजून असे काही सेलिब्रिटी आहेत जे अजूनही व्हॅलेंटाईन डे'च्या स्टोरीज आणि व्हिडिओ शेअर करत आहेत.

अलीकडेच कॉमेडीयन भारती सिंगने सांगितले की, या खास दिवशी तिचा पती हर्षने तिला रडवले. मात्र, नंतर हर्षला त्याची चूक लक्षात आली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

भारती सिंग सोशल मीडियावर कमालीची अॅक्टीव्ह असते. ती इंस्टाग्रामसह युट्यूबवर देखील व्हिडिओ पोस्ट करते. नुकताच तिने पती हर्ष सोबतचा व्हॅलेंटाईन डेचा एक  व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात ती रडताना दिसत आहे. दु:खी दिसत आहे.  

भारतीने हा व्हिडिओ शूट केला आहे. या व्हिडिओत भारती हर्षला सतत आज काय आहे? आज कोणता दिवस आहे ? असे प्रश्न विचारत आहे. पण हर्ष यावर प्रतिक्रिया देत नसल्याने ती रागावते आणि अखेर तिला अश्रू अनावर होतात. यावेळी दोघांमध्ये भांडण देखील होतं. हर्ष भारतीवर काहीसा रागावतो. पण नंतर तिला समजवण्याचा प्रयत्न ही करतो.

भारती सिंगने शेअर केलला हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. पतीला व्हॅलेंटाईन डे आठवत नसल्याने तिला त्याचा राग येतो. पण अखेर हर्ष सगळं काही ठिक करतो. आणि भारतीसाठी केक, फूल आणि गिफ्ट घेऊन येतो. 

हे सगळं पाहून भारती देखील खूश होते आणि हर्षला मिठी मारते. पण अखेर हर्ष पुन्हा भारतीसोबत मस्ती करायला सुरुवात करतो. ज्यामुळे पुन्हा ती हर्षवर रागावते. दोघांच्या नात्यातील काही क्षण त्यांनी या निमित्ताने चाहत्यांसोबत शेअर केला आहे.