भारतीचं कुटुंब पूर्ण, आनंदी आयुष्य कसं असतं, हे सांगणारा 'हा' फोटो

संघर्ष करून नाव कमवलेल्या भारतीवर आनंदाची बरसात; पाहा प्रसूतीनंतरचा पहिला फोटो   

Updated: Apr 7, 2022, 12:58 PM IST
भारतीचं कुटुंब पूर्ण, आनंदी आयुष्य कसं असतं, हे सांगणारा 'हा' फोटो  title=

मुंबई : कॉमेडियन भारती सिंग नुकतीच आई झाली आहे. तिने पती हर्ष लिंबाचियासोबत मुलाचे स्वागत केले आहे. 1 एप्रिलला भारती सिंगला मुलगी झाल्याची बातमी सोशल मीडियावर चर्चेत होती. ज्यानंतर भारतीने ही अफवा असल्याचे सांगत चर्चांना पूर्णविराम दिला होता. परंतु भारतीने आज म्हणजे 4 एप्रिलला एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे.

भारतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. आता भारतीला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. रुग्णालयाबाहेर येताचं फोटोग्राफर्सने भारतीच्या कुटुंबाला घेरलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

भारतीचा  प्रसूतीनंतरचा आणि बाळासोबताचा पहिला फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत. संघर्ष करून नाव कमवलेल्या भारतीवर आनंदाची बरसात आता भारतीवर होत आहे.