Tejasswi Prakash आणि Karan Kundra च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; अभिनेत्रीने तोडलं लग्न?

समोर आलेल्या माहिती नुसार तेजस्वी मात्र भलत्याच विचारात दिसतेय. तिचा प्लॅन थोडासा बदलेलाही दिसतोय.

Updated: Oct 4, 2022, 07:01 PM IST
Tejasswi Prakash आणि Karan Kundra च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; अभिनेत्रीने तोडलं लग्न? title=
Bad news for fans of Tejashwi Prakash and Karan Kundra Getting married nz

Tejasswi Prakash Wedding Plan: बिग बॉस 15 ची विजेती आणि सुप्रसिद्ध शो ‘नागिन 6’ (Naagin 6) मधील अभिनेत्री तेजस्वी प्रकाश () ही नेहमीच चर्चेत असते. बिग बॉस 15 मध्ये आल्यावर तिचं नशीब खुललं. हा शो जिकल्यानंतर तिला नवनवीन कामं मिळू लागलीत. (Bad news for fans of Tejashwi Prakash and Karan Kundra Getting married nz)

अभिनेत्री तेजस्वी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिला तिचे चाहते नेहमीच करण कुंद्रासोबत (Karan Kundra) कधी लग्न करणार असे प्रश्न सोशल मीडियावर विचारत असतात. चाहत्यांनाही असं वाटतं की तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्राने लवकरच लग्न केलं पाहिजे. पण आता समोर आलेल्या माहिती नुसार तेजस्वी मात्र भलत्याच विचारात दिसतेय. तिचा प्लॅन थोडासा बदलेलाही दिसतोय.

आणखी वाचा - Adipurush सिनेमाचा Teaser पाहून लोकांना का आठवतोय 'तारक मेहता का उल्ट चष्मा'?

खरंतर तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा या दोघांनाही लग्नाची घाई नाही. त्यामुळेच चाहत्यांना असं वाटतं की, तेजस्वीला लग्नाचं गांभीर्य नाही. काही चाहते तर असे देखील म्हणत आहेत की, तेजस्वीला करण कुंद्रासोबत लग्न करायचं नाही. ती फक्त त्याला डेट करत आहे.  तेजस्वी प्रकाशचा हा लेटेस्ट व्हिडीओ पाहून चाहतेही तिच्या मनात नेमकं काय चाललं याचा अंदाज लावण्याचा प्रयत्न करत आहेत.

हा व्हिडीओ शेअर करत तेजस्वी प्रकाशने, मी तुम्हा सर्वांना एक गोष्ट सांगू इच्छिते की , स्वत:साठी खेद व्यक्त करण्यापेक्षा खात्री बाळगणे चांगलं आहे. मला हे सर्व मुलींना सांगायचे आहे. निश्चित होण्यासाठी किती वेळ लागेल तो घ्या... ज्याला प्रश्न विचारायचा आहे, करण कुंद्राला विचारा, त्याला सर्व काही माहित आहे, असं म्हटलं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या पोस्टच्या माध्यमातून तेजस्वी प्रकाशने करण कुंद्रासोबत खात्री झाल्यानंतरच लग्न करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यावरुनच तेजस्वी प्रकाशला लग्नाची घाई नाही अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे.