Bachpan Ka pyar फेम सहदेवच्या कुटुंबीयांसाठी आशेचा किरण; गंभीर दुखापतीतून असा सावरतोय

सहदेवच्या चेहऱ्यावर पुन्हा खुललं हसू

Updated: Dec 30, 2021, 12:17 PM IST
Bachpan Ka pyar फेम सहदेवच्या कुटुंबीयांसाठी आशेचा किरण; गंभीर दुखापतीतून असा सावरतोय  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : Bachpan Ka pyar या गाण्याच्या व्हायरल व्हिडीओमुळं सहदेव दिरदो हा लहान मुलगा रातोरात प्रसिद्धीझोतात आला. सोशल मीडियाची ताकद काय असते हे सहदेवच्या उदाहरणातून अतिशय थेट स्वरुपात स्पष्ट झालं. हाच सहदेव एका अपघाताला सामोरा गेला. 

नुकतीच त्याच्या अपघाताची बातमी समोर आली, जिथं तो गंभीर जखमी झाल्याची बातमीही समोर आली. ज्यानंतर साऱ्या देशातून चिंतेची लाट पाहायला मिळाली. 

अनेकांनीच सहदेवसाठी प्रार्थना केल्या. पाहता पाहता या प्रार्थना जणू खरंच सहदेवसाठी फळल्या असंच म्हणावं लागेल. 

कारण, अपघातानंतरपासून बेशुद्ध अवस्थेत असणाऱ्या सहदेवला अनेक तासांनंतर शुद्ध आली, ज्यानंतर त्याच्या प्रकृतीतही सुधारणा झाल्याचं दिसून आलं. 

प्रकृती सावरत असताना सहदेवच्या चेहऱ्यावरव हसूही आलं, ज्यामुळं त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाही दिलासा मिळाला. 

सूत्रांच्या महितीनुसार सुकमा जिल्हा रुग्णालयात सहदेववर उपचार करत पाच टाके लावण्यात आले. सहदेवला 12 तास रुग्णालयात निरीक्षणाअंर्गत ठेवण्यात आलं होतं. 

सध्या त्याला पुढील उपचारांसाठी आणि न्यूरोसर्जनकडील उपचारांसाठी रायपूरला पाठवण्यात येणार आहे. 

तूर्तास सहदेवच्या जीवाला कोणताही धोका नाही हे मात्र दिलासादायक वृत्त ठरत आहे.