... म्हणून आराध्याला मीडियापासून दूर ठेवणार बच्चन कुटुंबिय

बच्चन कुटुंबातील लाडकी आराध्या बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटी किड्स पैकी एक आहे. आराध्याशी संबंधित अनेक बातम्या माध्यमांमध्ये येत असतात. पण त्या दिवशी असं काही घडलं की ऐश्वर्याला रडू कोसळलं.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Nov 24, 2017, 04:04 PM IST
... म्हणून आराध्याला मीडियापासून दूर ठेवणार बच्चन कुटुंबिय title=

मुंबई : बच्चन कुटुंबातील लाडकी आराध्या बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटी किड्स पैकी एक आहे. आराध्याशी संबंधित अनेक बातम्या माध्यमांमध्ये येत असतात. पण त्या दिवशी असं काही घडलं की ऐश्वर्याला रडू कोसळलं.

आराध्याच्या फोटोसाठी गोंधळ

आराध्याचा वाढदिवसाच्या देखील अनेक बातम्या मीडियामध्ये आली. अलीकडेच ऐश्वर्या आपल्या वडिलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एका चॅरिटी इवेंटमध्ये पोहोचली होती. तेथे मुलांच्या इव्हेंटमध्ये मीडियाच्या प्रतिनिधींकडून गोंधळ झाला. ऐश्वर्या आणि आराध्याच्या फोटोसाठी तेथे गोंधळ झाला.

ऐश्वर्याच्या डोळ्यात आले अश्रू

ऐश्वर्याने प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना शांत राहण्याचं आवाहन केलं. परंतु कोणीही तिचं ऐकलं नाही. अखेरीस, माध्यमांच्या अशा वागण्यामुळे ऐश्वर्याच्या डोळ्यात अश्रु आले. तिची आई रडत असल्याचं पाहून आराध्या देखील घाबरली. या घटनेनंतर बच्चन कुटुंबाने निर्णय घेतला आहे की ते आराध्याला कॅमेरापासून लांब ठेवणार आहेत.

आराध्याला आहे याची जाणीव

ऐश्वर्याने आराध्याल सांगून ठेवले आहे की, कुटुंबातील प्रत्येकजण बॉलिवूडशी संबंधित आहे. आराध्या लहान वयातच हे जाणून आहे की तिचं कुटुंब एक प्रसिद्ध कुटुंब आहे. त्यामुळे ती जेथे ही जाईल तेथे तिचे फोटो काढण्यासाठी गर्दी होईल. काही वेळा तर स्वत: आराध्याने फोटोसाठी एक मॉडेलप्रमाणे पोज दिले आहेत.