आज की पार्टी मेरी तरफ से; बाबा सिद्दीकींच्या इफ्तार पार्टीला सेलिब्रिटींची गर्दी

सलमानपासून शाहरुखपर्यंत सर्वांचीच उपस्थिती.... 

Updated: Jun 3, 2019, 11:22 AM IST
आज की पार्टी मेरी तरफ से; बाबा सिद्दीकींच्या इफ्तार पार्टीला सेलिब्रिटींची गर्दी  title=
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : कलाविश्वात सेलिब्रिटी त्यांच्या कामासोबतच एकमेकांसोबत असणाऱं मित्रत्वाचं नातंही जपताना दिसतात. याचीच प्रचिती येते राजकीय नेते बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीमध्ये. दरवर्षी प्रसिद्ध रमजानच्या महिन्यात इफ्तार पार्टीचं आयोजन करत सिद्दीकी साऱ्याच हिंदी चित्रपटसृष्टीला बोलावणं पाठवतात. त्यांच्या पाहुण्यांच्या यादीत मुख्य स्थान असतं ते म्हणजे किंग खान, शाहरुख आणि दबंग खान सलमानला. 

सिद्दीकी यांची ही पार्टी आणखी एका कारणासाठी खास आहे. कारण, काही वर्षांपूर्वी याच पार्टीत सलमान आणि शाहरुखमध्ये असणारे वाद मिटले होते. यंदाही याच पार्टीची रंगत पाहायला मिळाली. नुकत्याच पार पडलेल्या सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीला शाहरुख आणि सलमानने हजेरी लावत या क्षणांना आणखी रंगतदार केलं. 

 
 
 
 

A post shared by Azhar Khan - @BeingAzharKhan (@beingazharkhanofficial) on

 
 
 
 

A post shared by BHARAT-5 June 2019. (@bestofsalkat) on

पाहुण्यांशी गप्पा मारण्यापासून अनेकांसोबत सेल्फी घेतानाही त्या दोघांना पाहायला मिळालं. त्यांच्याशिवाय सलीम खान, कतरिना कैफ, अर्पिता आणि अल्विरा खान, आयुष शर्मा, अपारशक्ती खुराना, मौनी रॉय, उर्मिला मातोंडकर, सोनू सूद यांनीही या पार्टीला हजेरी लावली होती. 

 
 
 
 

A post shared by SnehZala (@snehzala) on

विनोदवीर अभिनेता सुनील ग्रोवरही यावेळी सिद्दीकी यांनी आयोजित केलेल्या या इफ्तार पार्टीचा आनंद घेताना दिसला. सोशल मीडियावर सलमान, शाहरुखच्या फॅनपेजव्यतिरिक्त इतरही अनेक अकाऊंटवरुन या पार्टीतील काही खास क्षण सर्वांच्याच भेटीला आले.  ज्यामध्ये विविध खाद्यपदार्थांची लज्जत चाखतानाच या इफ्तार पार्टीत गप्पांचे फडही रंगल्याचं पाहायला मिळत आहे.