मुंबई : 'बाहुबली' या चित्रपटातून झळकलेल्या लोकप्रिय अभिनेत्याने अखेर सोशल मीडियावरुन त्याच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याविषयी माहिती दिली आहे. सर्वत्र लॉकडाऊनचा काळ सुरु असताना 'बाहुबली' फेम या अभिनेत्याला त्याच्या जीवनभरासाठीच्या एका अनोख्या आणि तितक्याच सुरेखशा नात्यात लॉकडाऊन होण्याचा योग आला आहे.
आता तुम्हाला वाटेल प्रभासच्या जीवनात अखेर 'ती'ची एन्ट्री झालीच तर..... तसं नाही. वैयक्तिक जीवनात प्रेमाचा बहर आलेला हाल अभिनेता आहे, राणा डग्गुबती. खुद्द राणानेच सोशल मीडियावर एका सुरेख फोटोसह याविषयीची माहिती दिली. राणाच्या प्रेमाचा स्वीकार करणारी ती आहे, मिहीका बजाज.
'... ती हो म्हणाली', असं लिहित राणाने मिहिकासोबतचा फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये त्या दोघांचीही रिअल लाईफ केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. अतिशय अनोख्या अंदाजात या नव्या जोडीच्या प्रवासाची झालेली सुरुवात पाहता, येत्या काळात ते दोघंही लग्नगाठ बांधण्याच्या तयारीत असल्याचं स्पष्ट होत आहे.
चाहत्यांना याविषयीची माहिती मिळताच सोशल मीडियावर त्यांनी राणा आणि मिहिकाला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. शिवाय त्यांच्या लग्नाबाबतही उत्सुकताही व्यक्त केली.
Congratulations RANA(BALLALADEV) it's time to party Bro https://t.co/vDc5jIOxDE
— manu gummadi (@ManojkumarGumm2) May 12, 2020
Congratulations Rana @RanaDaggubati pic.twitter.com/x1zbpVUScM
— Vınay Chagantı (@UsthaadVinay) May 12, 2020
वाचा : 'भारतीयांनी ऑफिसमध्ये जास्तवेळ काम केले तर अर्थव्यवस्था पटकन उभारी घेईल'
राणाच्या खासगी आयुष्याविषयी सांगावं तर, यापूर्वी त्याचं नाव काही अभिनेत्रींसमवेत जोडलं गेलं होतं. पण, आता मात्र त्या साऱ्यातून बरंच पुढे येत राणा एका नव्या आयुष्याची सुरुवात करत असल्याचंच स्पष्ट होत आहे.