'बागी 2'चा नवा धमाका ! 200 कोटी क्लबमध्ये दमदार एन्ट्री

टायगर श्रॉफ 'स्टुडंट ऑफ द इयर' या सिनेमामध्ये व्यस्त झाला आहे. मात्र काही आठवड्यांपूर्वी रीलिज झालेला टायगर आणि दिशापटनीचा ' बागी 2' हा सिनेमा बॉक्सऑफिसवर मात्र अजूनही दमदार कामगिरी करत  आहे.  

Updated: Apr 14, 2018, 12:33 PM IST
'बागी 2'चा नवा धमाका ! 200 कोटी क्लबमध्ये दमदार एन्ट्री  title=

मुंबई : टायगर श्रॉफ 'स्टुडंट ऑफ द इयर' या सिनेमामध्ये व्यस्त झाला आहे. मात्र काही आठवड्यांपूर्वी रीलिज झालेला टायगर आणि दिशापटनीचा ' बागी 2' हा सिनेमा बॉक्सऑफिसवर मात्र अजूनही दमदार कामगिरी करत  आहे.  

दिशा आणि टायगर एकत्र 

दिशा पटणी आणि टायगर श्रॉफ ही नवी जोडी, टायगरचा चित्रपटातील  धमाकेदार अंदाज यामुळे 'बागी 2' चित्रपटाने अवघ्या 5-6 दिवसात 100 कोटींचा टप्पा पार केला होता. मात्र आता या चित्रपटाने 200 कोटींचाही टप्पा पार केला आहे. 

30 मार्चला रीलिज झालेल्या 'बागी 2' चित्रपटाने अवघ्या दोन आठवड्यामध्ये सुमारे 200 कोटींची कमाई केली आहे. यंदा 'पद्मावत'नंतर दमदार ओपनिंग मिळवणारा हा सिनेमा ठरला आहे. 

तरण आदर्शचं ट्विट  

ट्रेड अ‍ॅनालिस्ट तरण आदर्श यांनी केलेल्या ट्विटनुसार, देशभरात या चित्रपटाने 232.06 कोटींचीकमाई केली आहे. भारतामध्ये या चित्रपटाने 148.45 कोटींचा गल्ला कमावला आहे.  

 

 

काय आहे चित्रपटाची स्टोरी 

या चित्रपटात टायगर रणवीर प्रताप सिंग उर्फ रॉनीच्या भूमिकेमध्ये आहे. रॉनी या चित्रपटात कमांडो दाखवला आहे. तर नेहा(दिशा) रॉनीची कॉलेजमधली प्रेमिका आहे. नेहाचं लग्न दुसऱ्याबरोबर झाल्यावर ती रॉनीला ४ वर्षांनी भेटते. नेहा रॉनीला तिच्या किडनॅप झालेल्या मुलीला शोधण्यासाठी मदत मागते आणि चित्रपटामध्ये सगळी अॅक्शन सुरु होते.