मुंबई : चित्रपटाच्या कथानकाची गरज पाहता त्या अनुषंगानं दृश्यांची आखणी करण्याकडे निर्माते आणि दिग्दर्शकांचा कल असतो. अनेकदा या मंडळींना समाजाचा किंवा काही प्रेक्षकांच्याही रोषाचा सामना करावा लागतो. पण, त्यावरही मात करत पुढे येणारे हेच कलाकार पावलोपावली आपल्याला भारावण्याचं काम मात्र सुरुच ठेवतात.
'बीए पास' आणि 'चक दे इंडिया' फेम अभिनेत्री शिल्पा शुक्ला हिसुद्धा त्यापैकीच एक. वयाच्या चाळीशीमध्ये असणाऱ्या या अभिनेत्रीनं कायम चौकटीबाहेरच्या भूमिका साकारल्या आहेत.
दिल्ली विद्यापीठातून शिक्षण घेणारी ही अभिनेत्री तिच्या 'बीए पास' या चित्रपटातील भूमिकेमुळं विशेष चर्चेत आली.
फिल्मफेअरचा बेस्ट क्रिटीक्स अवॉर्डही तिच्या नावे करण्यात आला होता. अशी ही अभिनेत्री या चित्रपटातून कधीही नाही दिसली इतक्या बोल्ड अंदाजात झळकली होती.
एका मुलाखतीदरम्यान, तिनं या मुलाखतीसाठी आपल्याला नेमकं कोणी प्रेरित केलं याचा खुलासा केला होता.
'सुरुवातीला मी बरीच अडचणीत, त्याहीपेक्षा विवंचनेत होते. कारण चित्रपटामध्ये माझी अतिशय बोल्ड भूमिका होती. एक अभिनेत्री म्हणून माझ्या डोक्यात नेमकं काय सुरु आहे हे मला आठवतही नाही....
हा चित्रपट मला साकारायचा होता, पण त्यासाठी मी जेव्हा वडिलांना विचारलं तेव्हा ते इतकंच म्हणाले की तुला बोल्ड व्हावंच लागेल धोका पत्करावा लागेल.
त्यांना चित्रपट जगताविषयीची फार माहिती नाही, पण धोका पत्करल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही हा एक असा शेवटचा सल्ला आहे जो मला लक्षात राहिला आहे.... ' असं ती म्हणाली होती.